गुजरातमध्ये आढळली पाकिस्तानी बोट, बोटीतील नऊ जण ताब्यात
By Admin | Updated: October 2, 2016 21:09 IST2016-10-02T16:14:32+5:302016-10-02T21:09:11+5:30
भारत-पाकमधले संबंध ताणलेले असताना गुजरातमध्ये पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली आहे. तटरक्षक दलाने

गुजरातमध्ये आढळली पाकिस्तानी बोट, बोटीतील नऊ जण ताब्यात
>ऑनलाइऩ लोकमत
पोरबंदर, दि. 2- सर्जिकल स्ट्राइकनंतर भारत-पाकमधले संबंध ताणलेले असताना गुजरातमध्ये पाकिस्तानमधून आलेली संशयास्पद बोट आढळली आहे. तटरक्षक दलाने बोटीसोबतच त्यातील 9 जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
रविवारी सकाळी 10.15 वाजता तटरक्षक दलाला संशयास्पद बोट आढळली त्यानंतर तात्काळ त्या बोटीला घेराव घातला आणि बोट ताब्यात घेतली. ताब्यात घेण्यात आलेले 9 जण मच्छिमार असल्याचं सांगत आहेत. त्यांना पोरबंदरला घेऊन जाण्यात येत आहे. पोरबंदरमध्ये या सर्वांची कसून चौकशी केली जाणार आहे.