भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 15:03 IST2025-02-07T14:49:10+5:302025-02-07T15:03:32+5:30

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली असून सैन्याने ७ घुसखोरांना ठार केले.

Pakistani BAT Army was about to enter Indian border and attack Indian Army attacked, 7 killed | भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार

भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार

भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये मोठी कारवाई केली असून भारतीय सैन्याने ७ पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले आहे. यामध्ये २-३ पाकिस्तानी लष्करी सैनिकांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना ४ फेब्रुवारीच्या रात्री घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पूंछ जिल्ह्यातील कृष्णा व्हॅलीजवळ घडली. घुसखोरांचा उद्देश भारतीय चौकीला लक्ष्य करणे होता. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमवर हल्ला केला, ही टीम सीमापार कारवाईत तज्ज्ञ आहे.

"३९ लाख मतदार सगळीकडे फिरणार; महाराष्ट्र पॅटर्न आता दिल्ली, बिहारमध्ये राबवणार"

हे दहशतवादी अल बद्र ग्रुपचे असू शकतात. या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी अल बद्र ग्रुपचे सदस्य असू शकतात. काही दिवसापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी  भारतासोबतचे सर्व प्रश्न चर्चेद्वारे सोडवू असं सांगितलं होतं. दरम्यान, आता ही घुसखोरी केल्याचा प्रयत्न समोर आला आहे. 

हमासचे नेतेही उपस्थित

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विधानानंतरच सरकारने पीओकेच्या रावळकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाला रॅलीसाठी परवानगी दिली होती. यावेळी ते बंदुका आणि AK-47 हातामध्ये घेऊन उंचावत असल्याचे समोर आले. या रॅलीत भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये हमासचे नेतेही उपस्थित होते.

पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विधानानंतरच सरकारने पीओकेच्या रावळकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाला रॅलीसाठी परवानगी दिली होती. यावेळी ते बंदुका आणि AK-47 हातामध्ये घेऊन उंचावत असल्याचे समोर आले. या रॅलीत भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या. यामध्ये हमासचे नेतेही उपस्थित होते.

पाकिस्तानी घुसखोर कुख्यात बॉर्डर अॅक्शन टीमच्या मदतीने भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा प्लॅन होता.  सीमा कृती पथकांना नियंत्रण रेषेवरून छुप्या पद्धतीने हल्ले करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. या पाकिस्तानी एजन्सीने यापूर्वीही सीमेवर भारतीय सैनिकांवर हल्ला केला आहे. या संघटनेने पुन्हा एकदा भारतीय सैनिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी घुसखोरांना दिसताच भारतीय सैनिकांनी त्यांना ठार केले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये अल-बद्र या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.
 

Web Title: Pakistani BAT Army was about to enter Indian border and attack Indian Army attacked, 7 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.