शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:15 IST

बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर...!

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री तथा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला काश्मीर, सिंधू पाणी करार आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, हे प्रश्न व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात, असेही बिलावर यांनी म्हटले आहे. याच वेळी त्यांनी, जर सिंधू पाणी करारावरील स्थगिती उठवली गेली नाही तर, पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही, अशी पोकळ धमकीही दिली आहे.'एक्सप्रेस ट्रिब्यून' वृत्तपत्रातील वृत्तानुसार, पाश्चात्य देशांच्या दोऱ्यावर संसदीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करत असलेल्या बिलावर यांनी रविवारी (15 जून, 2025) ब्रसेल्स दौऱ्यादरम्यान जर्मन प्रसारक 'डॉईश वेले उर्दू' ला दिलेल्या मुलाखतीत हे भाष्य केले आहे.

बिलावर म्हणाले, 'पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सर्व प्रलंबित मुद्दे केवळ व्यापक चर्चेद्वारेच सोडवले जाऊ शकतात. जर भारत चर्चेसाठी टेबलावर आला नाही तर, ते त्यांच्या हिताचे ठरणार नाही. पाकिस्तानचा पाणीपुरवठा खंडित करण्याच्या भारताच्या कोणताही प्रयत्नाकडे अस्तित्वाला धोका म्हणून पाहिले जाईल. परिणामी, पाकिस्तानला युद्धाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.

पीपीपी अध्यक्ष म्हणाले, पाकिस्तानला युद्ध नको आहे. परंतु तो राष्ट्रीय सुरक्षेशी किंवा पाण्याच्या हक्कांशी तडजोड करणार नाही. पाकिस्तान शांततेचा पुरस्कार करत राहील, मात्र पाणी सुरक्षेसारख्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही.

एक दिवस आधीच, बिलावल भुट्टो झरदारी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताला वाटाघाटीच्या टेबलावर आणण्याचे आवाहन केले होते. तत्पूर्वी, भारताने स्पष्ट केले आहे की, आपण पाकिस्तानसोबत केवळ पीओके (पाकव्याप्त काश्मीर) परत देण्यासंदर्भात आणि दहशतवादासंदर्भातच चर्चा करणार.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतWaterपाणीPOK - pak occupied kashmirपीओके