पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन, २० भारतीय चौक्यांवर गोळीबार
By Admin | Updated: August 18, 2014 12:28 IST2014-08-18T09:50:52+5:302014-08-18T12:28:40+5:30
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील अरनिया व आरएसपुरा सेक्टरमधील २० भारतीय चौक्यांवर गोळीबार केला.

पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन, २० भारतीय चौक्यांवर गोळीबार
>ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. १८ - पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील अरनिया व आरएसपुरा सेक्टरमधील २० भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. गेल्या २४ तासांत शस्त्रसंधी उल्लंघनाची ही तिसरी घटना आहे.
पाकिस्तानी सैन्याने अरनिया आणि आरएस पुरा सेक्टररमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) चौक्यांवर रात्रभर गोळीबार केला. या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.