शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर - कॅप्टन अमरिंदर सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 09:04 IST

पाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाब पोलिसांना तपासात आढळले आहे.

ठळक मुद्देपाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाब पोलिसांना तपासात आढळले आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाला केले. पोलिसांनी AK-47 रायफल, सॅटेलाइट फोन आणि हँड ग्रेनेड यासारखा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तान ड्रोनचा वापर हा पंजाबमध्ये शस्त्रास्त्र पाठवण्यासाठी करत असल्याचे पंजाबपोलिसांना तपासात आढळले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन रविवारी (22 सप्टेंबर) भारतीय हवाई दल आणि सीमा सुरक्षा दलाला केले आहे. 

पोलीस उपमहासंचालक दिनकर गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'पाकिस्तान आयएसआय, पाकपुरस्कृत जिहादी आणि पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली काम करणाऱ्या खलिस्तानवादी दहशतवादी संघटना यांनी अलीकडेच भारत-पाक सीमेपलीकडे पाठवलेल्या ड्रोनद्वारे शस्त्रास्त्र पोहोचवण्यात आल्याचा संशय आहे.'

पंजाब पोलिसांनी पाकिस्तान आणि जर्मनीतील एक दहशतवादी गट यांचा पाठिंबा असलेले पुनरुज्जीवित खलिस्तान जिंदाबाद फोर्सचे एक मॉड्यूलवर कारवाई केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. पंजाब आणि आसपासच्या परिसरात दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होते. पोलिसांनी AK-47 रायफल, सॅटेलाइट फोन आणि हँड ग्रेनेड यासारखा शस्त्रसाठा जप्त केला आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. 

भारतात दहशतवादी घातपात घडविण्यासाठी आलेलं दहशतवादी रॅकेट रविवारी पंजाब पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तान आणि जर्मनी येथील दहशतवादी संघटनांना पाठबळ देणाऱ्या खलिस्तान झिंदाबाद फोर्सच्या (केझेडएफ) दहशतवाद्यांच्या रॅकेटचे पंजाब पोलिसांनी कंबरडं मोडलं आहे. या दहशतवाद्यांकडे खूप मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. 5 एके-47 रायफल, पिस्तूल, सॅटेलाईट फोन आणि हॅन्ड ग्रेनेड्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा हा मोस्ट वाँटेड दहशतवादी मोहम्मद कलिमुद्दीन मुजाहिरला आसाम एटीएसने टाटा नगर रेल्वे स्टेशन येथून अटक केली आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्थानिक तरुणांचे दहशतवादी गटांमध्ये भरतीचे होण्याचे प्रमाण आतापर्यंत सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा केला आहे. गेल्या 45 दिवसांत फक्त दोन जण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी