शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

जम्मू-काश्मीरमधील तणाव वाढवण्यासाठी पाकिस्तानच्या नापाक हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 08:27 IST

पुढील काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील तणाव वाढवण्यासाठी पाकिस्ताननं हालचाली सुरू केल्या आहेत. गुप्तचर विभागानं दिलेल्या अहवालानुसार पाकिस्तानकडून लष्कर-ए-तोयबाला एके-47 रायफल, ग्रेनेड आणि ऍण्टी-थर्मल जॅकेट यांच्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं पुरवली जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील सरकारमधून भाजपा बाहेर पडल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यातील तणावपूर्ण स्थितीत भर घालण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर मे महिन्यात झालेल्या गोळीबारात एक बीएसएफ जवान शहीद झाला होता. पाकिस्तानी सैनिकानं ऍण्टी-थर्मल जॅकेट परिधान करुन गोळीबार केल्याची शक्यता त्यावेळी वर्तवण्यात आली होती. या जॅकेटमुळे नाईट व्हिजन असलेल्या डिव्हाईसला चकवा देता येतो. सीमेवर झालेल्या स्नायपर फायरिंगमध्ये जवान शहीद झाला असावा, असा अंदाज सुरुवातीला बीएसएफच्या स्थानिक कमांडरनं व्यक्त केला होता. मात्र एका हँड हेल्ड थर्मल इमेजरच्या (एचएचटीआय) फुटेजमध्ये एक काळी सावली दिसून आली. ही सावली बीएसएफच्या चौकीच्या अगदी जवळ होती. तिथूनच बीएसएफच्या जवानावर गोळीबार करण्यात आला होता. एचएचटीआयमध्ये काळी सावली स्पष्ट दिसत नव्हती. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीनं ऍण्टी-थर्मल जॅकेट परिधान केल्यानं त्याची सावली दिसली नसावी, असा अंदाज त्यावेळी व्यक्त करण्यात आला होता. मात्र एचएचटीआय शरीरातील उष्णतेच्या मदतीनं त्या भागातील व्यक्तीला शोधून काढतं. ऍण्टी-थर्मल जॅकेट परिधान करुन दहशतवाद्यांकडून घुसखोरी केली जाऊ शकते, अशी शक्यता यानंतर बीएसएफच्या सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. याशिवाय लष्कर-ए-तोयबाला मोठ्या प्रमाणात मॅगझिन, पिस्तुल, डेटोनेटर आणि नाईट व्हिजन डिव्हाईस पुरवण्यात येत असल्याचंही वृत्त आहे. या हत्यारांच्या मदतीनं पुढील काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होऊ शकते.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान