पाककडून तोफगोळ्यांचा मारा

By Admin | Updated: August 17, 2015 23:32 IST2015-08-17T23:32:36+5:302015-08-17T23:32:36+5:30

पाकिस्तानी सैन्याने रविवारी रात्री दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पूँछ जिल्ह्णाच्या नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्या आणि खेड्यांवर १२० एमएम आणि ८२ एमएमच्या

From Pakistan, the target shoots | पाककडून तोफगोळ्यांचा मारा

पाककडून तोफगोळ्यांचा मारा

जम्मू : पाकिस्तानी सैन्याने रविवारी रात्री दोनदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पूँछ जिल्ह्णाच्या नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्या आणि खेड्यांवर १२० एमएम आणि ८२ एमएमच्या तोफगोळ्यांचा मारा केला.पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचा हा लागोपाठ नववा दिवस होता. आॅगस्ट २००३ मध्ये पाकिस्तानी सैन्याने ४० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यावर्षी आॅगस्टमध्ये ही संख्या २३० वर गेली आहे. पूँछ जिल्ह्णाच्या सौजियन आणि मंडी भागात पाकिस्तानकडून सातत्याने उखळी तोफांचा मारा केला जात आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: From Pakistan, the target shoots