दहशतवाद संपविण्यासाठी पाकने भारताची मदत घ्यावी, गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:43 IST2018-12-03T03:43:26+5:302018-12-03T03:43:35+5:30
दहशतवादाला एकट्याने पायबंद घालता येत नसेल, तर त्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले आहे.

दहशतवाद संपविण्यासाठी पाकने भारताची मदत घ्यावी, गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आवाहन
बन्सूर/जयपूर : दहशतवादाला एकट्याने पायबंद घालता येत नसेल, तर त्यासाठी पाकिस्तानने भारताची मदत घ्यावी, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी रविवारी म्हटले आहे. ते म्हणाले की, अफगाणिस्तानमधील तालिबानींना संपविण्यासाठी पाकिस्तानने अमेरिकेची मदत घेतली होती. सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा मुद्दा गंभीर आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी पाकिस्तानने भारताशी चर्चा केली पाहिजे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.