पाकिस्तानला भूकंपाचा धक्का

By Admin | Updated: May 9, 2014 23:41 IST2014-05-09T23:41:30+5:302014-05-09T23:41:30+5:30

आग्नेय पाकिस्तान शुक्रवारी दोनवेळा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. त्यात एक जण ठार झाला असून, ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

Pakistan shakes the earthquake | पाकिस्तानला भूकंपाचा धक्का

पाकिस्तानला भूकंपाचा धक्का

 कराची : आग्नेय पाकिस्तान शुक्रवारी दोनवेळा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. त्यात एक जण ठार झाला असून, ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.५ आणि ४.६ एवढी मोजली गेली. अमेरिकी भूर्गभ सर्वेक्षण संस्थेनुसार पहिला भूकंपाचा धक्का पहाटे ३.५० वाजता बसला. याची तीव्रता ४.५ रिश्टर एवढी मोजली गेली. सिंध प्रांताच्या नवाबशाह शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिदू होता. दुसरा भूकंपाचा झटका यानंतर एक तासाने बसला. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ एवढी मोजली गेली. नवाबशाह शहरापासून १३ किलोमीटर उत्तरेला याचा केंद्रबिदू होता. भूकंपामुळे काही घरांचे छत पडल्याचे समजते. अधिकार्‍यांनी सांगितले की, भूकंपामुळे एका व्यक्तीचा जीव गेला आणि महिला व मुलांसह ३० जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारी होणार्‍या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या भागात भूकंपोत्तर धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने ३०० हून अधिक जण मारले गेले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan shakes the earthquake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.