शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 10:07 IST

या भागाचा इतका विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरचे लोक हे पाहून भारतात सामील होऊ इच्छितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जम्मू - पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेने भारतात सामील व्हावे, असे आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. 'आम्ही तुम्हाला आपले मानतो, तर पाकिस्तान तुम्हाला विदेशी मानतो', असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीनिमित्त रामबन मतदारसंघात भाजप उमेदवार राकेशसिंह ठाकूर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत राजनाथ सिंह बोलत होते.

कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन देणाऱ्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस युतीवर राजनाथ सिंह यांनी प्रखर टीका केली. जोवर भाजप आहे, तोवर हे अशक्य आहे, असे त्यांनी सुनावले. कलम-३७० रद्द केल्यापासून राज्यात होत असलेल्या बदलाचे स्वागत करून राजनाथ सिंह म्हणाले, येथील युवकांच्या हाती आता पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हरऐवजी लॅपटॉप कॉम्प्युटर आहेत, विकास हवा असेल, तर भाजप सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले. या भागाचा इतका विकास होईल की, पाकव्याप्त काश्मीरचे लोक हे पाहून भारतात सामील होऊ इच्छितील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री कुणाचा हे सांगणे अशक्य काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडीचा विजय झाला, तर मुख्यमंत्री दोघांपैकी कोणत्या पक्षाचा है भाकीत इतक्यात वर्तवता येणार नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा यांनी म्हटले. ही निवडणूक केवळ सरकार किवा नेत्यांचे पुनर्वसन करण्यापुरती मर्यादित नाही, असे ते म्हणाले.

हिंदू मतदारांना भीती दाखविण्याचा प्रयत्न  

भाजपचे नेते जम्मू-काश्मीरमधील हिंदूमध्ये भीती पसरवू पाहत असल्याचे फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. या हेतूनेच भाजप नेत्यांनी जम्मूवर लक्ष केंद्रित केले आहे.  आघाडी पुन्हा सत्तेत आली, तर प्रदेशात पुन्हा दहशतवाद बोकाळेल, अशी अनाठायी भीती पसरवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहPOK - pak occupied kashmirपीओकेBJPभाजपा