शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 11:44 IST

कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांसोबत पाकिस्तानातील पत्रकारांनी केलेल्या गैर वर्तणुकीनंतर पाकिस्तानचा आणखी एक घाणेरडा चेहरा समोर आला आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांसोबत पाकिस्तानातील पत्रकारांनी केलेल्या गैर वर्तणुकीनंतर पाकिस्तानचा आणखी एक घाणेरडा चेहरा समोर आला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आई यांचा अपमान होईल, त्यांना त्रास होईल, असे प्रश्न विचारणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं पाठ थोपटली आहे. पाकिस्ताननं या पत्रकारांना चक्क थँक यू म्हटल्याचे माहिती समोर आली आहे.

हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची पत्नी व आई सोमवारी (25 डिसेंबर) पाकिस्तानात गेल्या होत्या. कुलभूषण यांच्या पत्नी व आई या दोघी सोमवारी इस्लामाबादमध्ये जाधव यांना भेटल्या तेव्हा त्यांना कशी अपमानास्पद वागणूक दिली गेली, याचे सविस्तर निवेदन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जारी केले होते.  

यावेळी या दोघींना पाकिस्तानातील पत्रकारांचा शाब्दिक हल्लादेखील सहन करावा तसंच पत्रकारांनी उलट-सुलट प्रश्न विचारत त्यांना त्रासदेखील दिला. इस्लामाबादमध्ये कुलभूषण जाधव यांच्यासोबत भेट झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला एका पत्रकारानं विचारलं की, “तुमच्या पतीनं हजारो निष्पाप पाकिस्तानी नागरिकांच्या हत्या करुन त्यांच्या रक्ताची होळी खेळली आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे.?  (आपके पतिदेव ने हजारों बेगुनाह पाकिस्तानियों के खून से होली खेली है, इसके बारे में क्या कहती हैं आप?' ), तर कुलभूषण जाधव यांच्या आईला, 'गुन्हेगार मुलाला भेटून तुम्हाला कसं वाटत आहे?'  (अपने कातील बेटे से मिलने के बाद आपके क्या जजबात हैं? ), असे अपमानास्पद प्रश्न  पाकिस्तानी मीडियानं विचारले.

वृत्तवाहिनी 'टाइम्स नाऊ'नं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी पत्रकारांकडून जाधव कुटुंबीयांना मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीबाबत त्यांचे कान उघाडणी करण्याऐवजी पाकिस्तानी सरकारनं चक्क त्यांना धन्यवाद केल्याची धक्कादायक व संतापजनक माहिती समोर आली आहे. 'तुम्ही लोकांनी खूप चांगले काम केले', असं म्हणत पाकिस्तानी सरकारनं पत्रकारांची पाठ थोपटली आहे.  

जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’  - पाकचा कांगावाशिवाय, कुलभूषण जाधव यांच्या पत्नी जे बूट घालून आल्या होत्या त्यात ‘धातूची संशयास्पद वस्तू’ आढळली म्हणून त्यांना ते बूट भेटीनंतर परत दिले गेले नाहीत, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. भेटीनंतर जाधव यांच्या पत्नीची पादत्राणे वारंवार विनंती करूनही परत दिली गेली नाहीत, याचा उल्लेख होता. असे करण्यामागे पाकिस्तानचा काही वाईट हेतू असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही भारताने दिला होता.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैजल यांनी भारताच्या या निवेदनावर प्रतिक्रिया देताना अशी मखलासी केली की, जाधव यांची पत्नी जे बूट घालून आली होती त्यात एक संशयास्पद धातूची वस्तू आढळली. ती नेमकी काय आहे याची ‘फॉरेन्सिक तपासणी’ करण्यासाठी त्यांचे बूट ठेवून घेण्यात आले व त्यांना घालायला लगेच दुसरी पादत्राणे देण्यात आली.

जाधव यांच्या आई व पत्नीला भेटीसाठी जाताना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळाची टिकलीही काढून ठेवायला सांगून पाकिस्तानने त्यांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा अनादर केला, असे भारताचे म्हहणे होते. शिवाय त्या दोघींना घालून आलेले कपडे बदलून आत जायला सांगितले, असेही भारताने म्हटले होते. कथित सुरक्षेच्या कारणास्तव असे करण्याची काय गरज होती याचा खुलासा न करता डॉ. फैजल फक्त एवढेच म्हणाले की, या दोघींना भेटीसाठी जाताना जे जे काढून ठेवायला सांगितले गेले ते सर्व त्यांना भेटीनंतर परत देण्यात आले.काचेच्या तावदानाआडून घडविलेली भेट, त्यावेळी भारताचे उप उच्चायुक्त जे. पी. सिंग यांना आणखी एका काचेमागे उभे केले जाणे व पाकिस्तानी पत्रकारांना जाधव यांच्या आई व पत्नीच्या जवळ जाऊ दिल्याने त्यांच्याकडून या दोघींना उद्देशून आक्षेपार्ह विधाने केली जाणे, असे इतर आक्षेपही भारताने नोंदविले होते. त्या प्रत्येकाला उत्तर न देता पाकिस्तानने अशी भूमिका घेतली की, या सर्व बाबतीत त्याच वेळी हरकत घेता येऊ शकली असती. २४ तास उलटल्यानंतर या गोष्टींची वाच्यता करणे ही पश्चातबुद्धाने केलेली वायफळ बडबड आहे व त्यासंदर्भात भारताच्या तोंडाला लागण्याची आमची इच्छा नाही!  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तान