शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
3
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
4
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
5
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
6
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
7
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
8
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
9
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
10
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
11
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
12
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
13
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
14
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 17:35 IST

भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असतानाही मोठा खुलासा! पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या किती भारतीय कैदी आहेत, याची आकडेवारी समोर आली आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीदारम्यानच आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्यातुरुंगांमध्ये सध्या २४६ भारतीय नागरिक कैद आहेत, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत निवेदनात दिली आहे.

या २४६ भारतीयांमध्ये ५३ सामान्य नागरिक आणि १९३ मच्छीमार आहेत. कैद असलेले हे मच्छीमार प्रत्यक्ष भारतीय आहेत किंवा त्यांच्यावर भारतीय असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरवर्षी होते कैद्यांची यादीची देवाणघेवाणभारत आणि पाकिस्तानमध्ये २००८मध्ये झालेल्या दूतावासीय संपर्क कराराअंतर्गत (Consular Access Agreement) दरवर्षी १ जानेवारी आणि १ जुलै रोजी दोन्ही देश एकमेकांना त्यांच्या तुरुंगात असलेल्या दुसऱ्या देशाच्या नागरिकांची यादी देतात. आज (१ जुलै २०२५) ही प्रक्रिया पार पडली असून, यामध्येच पाकिस्तानने २४६ भारतीयांची माहिती भारताला दिली आहे.

भारताच्या तुरुंगातही ४६३ पाकिस्तानी नागरिकभारताकडून पाकिस्तानला दिलेल्या यादीनुसार, भारतात सध्या ३८२ पाकिस्तानी नागरिक आणि ८१ पाकिस्तानी मच्छीमार कैद आहेत. भारत सरकारनुसार, त्यांच्यावरही आवश्यक कारवाई सुरू आहे.

२०१४पासून किती भारतीय सुटले?भारत सरकारच्या माहितीनुसार, २०१४पासून पाकिस्तानने २,६६१ भारतीय मच्छीमार आणि ७१ नागरिकांना सोडले आहे. २०२३ मध्ये ५०० मच्छीमार आणि १३ नागरिक भारतात परतले आहेत.

भारताने स्पष्ट केले आहे की, कैद्यांशी संबंधित मानवीय बाबी राजकीय नात्यांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत. निर्दोष लोकांनी वर्षानुवर्षं तुरुंगात सडत राहू नये, यासाठी भारत सरकार सक्रिय आहे.

भारताची पाकिस्तानकडे ठाम मागणीपाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या १५९ भारतीय कैद्यांची शिक्षा पूर्ण झाली असून, त्यांना तात्काळ भारतात परत पाठवावे, अशी मागणी भारताने केली आहे. तसेच, २६ कैद्यांना दूतावासीय संपर्काची परवानगी द्यावी, अशीही मागणी भारताकडून करण्यात आली आहे.

भारतही जबाबदारी पार पाडतोय!भारत सरकारने देखील ८० पाकिस्तानी कैद्यांच्या राष्ट्रीयतेची पुष्टी करण्यासाठी त्यांची माहिती पाकिस्तानकडे पाठवली आहे. परंतु, पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही सूचना न आल्याने त्यांची पाठवणी थांबली आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPrisonतुरुंग