शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:54 IST

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी एका डच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षावर मध्यस्थी केल्याचा दावा स्पष्टपणे फेटाळला आहे. त्यांनी सांगितले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांचा परस्पर संपर्क झाला आणि त्यातूनच युद्धविरामाची चर्चा झाली. अमेरिकेचा मध्यस्थीचा दावा खोटा असून, दोन्ही देशांमधील परिस्थिती दोहोंच्या संवादातूनच निवळली, असे त्यांनी स्पष्ट केले.

पहलगाम येथील हल्ल्याचे उद्दिष्ट धार्मिक उन्माद पसरवणे होते, असे जयशंकर यांनी नमूद केले. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, "आम्ही या काळात अमेरिकेसह इतर अनेक देशांशी संपर्कात होतो, पण भारताने कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय पाकिस्तानसोबत थेट संवाद साधला."

पाकिस्तानने स्वतःच युद्धविरामाचा प्रस्ताव मांडला!पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून युद्धविरामा प्रस्ताव आला होता, असेही जयशंकर यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवाद्यांवर केलेल्या निर्णायक कारवाईमुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती. यानंतरच संघर्ष थांबला आणि सीमारेषेवर तात्पुरती शांतता प्रस्थापित झाली.

मी व्यवसायाद्वारे भारत-पाक तणाव कमी केला : ट्रम्पदरम्यान, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव व्यवसाय आणि संवादाच्या माध्यमातून कमी केला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशी संवादादरम्यान ट्रम्प म्हणाले, "मी भारतासोबत खूप काम केलं, पाकिस्तानसोबतही काम केलं. आम्ही त्यांच्याशी बोललो आणि युद्धविराम घडवून आणला. पाकिस्तानमध्ये काही अद्भुत लोक आहेत, चांगले नेते आहेत, आणि भारतही माझा चांगला मित्र आहे."

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला