शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

करतारपूर कॉरिडॉर: भूमिपूजन कार्यक्रमासाठी पाकिस्तानकडून सुषमा स्वराज यांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 23:20 IST

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवजोत सिंह यांनाही निमंत्रण

इस्लामाबाद/गुरदासपूर: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये निर्माण झालेली कटुता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्ताननं करतारपूर कॉरिडॉरच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना दिलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. पाकिस्तानमध्ये 28 नोव्हेंबरला करतारपूर कॉरिडॉरचं भूमिपूजन होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. शीख समुदाय बऱ्याच कालावधीपासून पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यातील डेरा नानक शाहपासून करतारपूरपर्यंत कॉरिडॉर बांधण्याची मागणी करत होता. दोनच दिवसांपूर्वीच भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कॉरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान सरकारनं भारताच्या या भूमिकेचं स्वागत केलं आहे. त्यामुळेच भूमिपूजनाच्या समारंभासाठी सुषमा स्वराज यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवजोत सिंह यांनादेखील कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आलं आहे. एकीकडे पाकिस्तान कॉरिडॉरच्या भूमिपूजनासाठी जोरदार तयारी करताना भारताकडूनही समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. डेरा बाबा नानक-करतारपूर साहेब कॉरिडोरचं भूमिपूजन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते होणार आहे. 26 नोव्हेंबरला हा कार्यक्रम संपन्न होईल. गुरुदासपूरमधल्या मानगावमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अन्न आणि प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. 

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराजPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPunjabपंजाबNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धू