India Masood Azhar: देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी भूज येथे बोलताना एक मोठा दावा केला आहे. भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे जे अड्डे उद्ध्वस्त केले आणि नेटवर्क तोडले आहे; ते पुन्हा तयार करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहेत. तशी घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. पाकिस्तान सरकारने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला १४ कोटीची मदत करणार आहे, असे ते म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूज येथील हवाई दलाच्या एअरबेसला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कशी मदत दिली जात आहे, याकडे आयएमएफ अर्थात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे लक्ष वेधले.
राजनाथ सिंह काय म्हणाले?
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हवाई दलाच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक केले. याचवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला जी मदत करण्यात आली आहे, त्याचा वापर कसा दहशतवाद्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जात आहे, यावर भाष्य केले.
"मुरिदके येथील लश्कर ए तोयबाचे आणि बहावलपूर येथील जैश ए मोहम्मदचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ते पुन्हा बांधण्यासाठी आर्थिक मदत करण्याची घोषणा पाकिस्तान सरकारने केली आहे. आंतरराष्ट्रीय निधीकडून येणाऱ्या एक बिलियन डॉलर्स मदतीपैकी काही पैसा दहशतवाद्यांचे अड्डे बांधण्यासाठी वापरले जाणार आहे. मग ही आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून अप्रत्यक्षपणे दहशतवाद्यांना मदत नाही का?", असा सवाल राजनाथ सिंह यांनी आयएमएफला केला आहे.
वाचा >>गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे ९ अड्डे उद्ध्वस्त केले. हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाच्या इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर आंतरराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानला १ बिलियन डॉलर्स म्हणजे ८,५०० कोटी रुपये कर्ज दिले आहे. आयएमएफच्या विस्तारित निधी सुविधेचा भाग म्हणून हा निधी पाकिस्तानला देण्यात आला आहे. ही रक्कम कर्जाच्या स्वरुपात दिली जाते आणि त्याची परतफेड करावी लागते.