पाकिस्तानचा सीमा चौक्यांवर गोळीबार

By Admin | Updated: August 2, 2015 00:22 IST2015-08-02T00:22:42+5:302015-08-02T00:22:42+5:30

पाकिस्तानी सैनिकांनी जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आघाडीच्या भारतीय चौक्यांवर शनिवारी गोळीबार करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी

Pakistan border border firing | पाकिस्तानचा सीमा चौक्यांवर गोळीबार

पाकिस्तानचा सीमा चौक्यांवर गोळीबार

जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आघाडीच्या भारतीय चौक्यांवर शनिवारी गोळीबार करून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
गोळीबारात तीन भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले होते. बीएसएफ प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी सकाळी १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास कुठल्याही चिथावणीशिवाय अखनूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या चौक्यांवर गोळीबार करण्यासह तोफगोळे डागले. गोळीबारात कुठलीही जीवहानी झाली नाही.
यापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी २९ आणि ३० जुलैदरम्यान नियंत्रण रेषेजवळ चार वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
जुलैमध्ये नियंत्रणरेषेवर पाकच्या सैनिकांनी तीनदा हल्ला केला. पूंछमध्ये लष्कराचा एक जवान शहीद झाला. काश्मीर खोऱ्यात नियंत्रणरेषेवर अशाच घटनेत बीएसएफचे दोन जवान शहीद झाले होते.
गेल्या महिन्यात भारत-पाक सीमेवर १८ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून, यात ३ जवान शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan border border firing