पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर हे अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी काल अमेरिकेतून भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली. या धमकीला आता भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अशा धमक्यांपुढे झुकणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताने मुनीर यांच्या विधानाला बेजबाबदार म्हटले आहे.
असीम मुनीर यांच्या विधानांवरून अण्वस्त्रे चुकीच्या हातात जाऊ शकतात असेही दिसून येते. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांचे हे विधान खूप धोकादायक आहे आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीची कोणतीही ठोस व्यवस्था नाही आणि तेथे खरी सत्ता लष्कराकडे आहे.
असीम मुनीर यांचे विधान काय?
असीम मुनीर यांनी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टाम्पा येथे पाकिस्तानी नागरिकांसोबत बोलताना म्हटले होते की, "आपण एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. जर आपल्याला असे वाटले की आपण बुडत आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन बुडू."
ज्यावेळी अमेरिका पाकिस्तानी सैन्यासोबत उभी राहते तेव्हा तेथील सैन्य आपला आक्रमक चेहरा दाखवू लागते. यावेळीही अमेरिकेचा पाठिंबा मिळाल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी उघडपणे धमकी दिली आहे.
पाकिस्तानमध्ये सत्तापालट होऊ शकतो
येणाऱ्या काही दिवसात पाकिस्तानमध्ये सत्तापालट होऊ शकते. असीम मुनीर पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात.
पाकिस्तानमधील अण्वस्त्रांच्या सुरक्षेला गंभीर धोका असल्याचे भारतीय सरकारी सूत्रांचे मत आहे. ही शस्त्रे दहशतवादी आणि बेजबाबदार लोकांच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही सांगण्यात येत आहे.
फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
ऑपरेशन सिंदूरनंतरपाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे भारताविरोधात गरळ ओकता-ओकता त्यांच्या मुखातून पुन्हा एकदा सत्य बाहेर पडले आहे. भारत एक चकचकित मर्सिडिज, तर पाकिस्तान कचरा वाहून नेणारा डंपिंग ट्रक आहे, असे म्हणत असीम मुनीर यांनी पाकिस्तानची आब्रू पार जगाच्या वेशीवर टांगली आहे. ते अमेरिकेतील फ्लोरिडा येथील टॅम्पा येथे एका ब्लॅक टाय डिनर पार्टीला उपस्थित होते. पाकिस्तानी व्यापारी अदनान असद यांनी या पार्टीचे आयोजन केले होते.
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात बोलताना मुनीर यांनी अमेरिकेत आपली भडसा काढली. बालीश धमकी देताना मुनीर म्हणाले, जर भारतामुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले, तर पाकिस्तान अर्ध्या जगाला आपल्या सोबत घेऊन बुडेल.