शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट', हरसिमरत कौर यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 15:09 IST

नवज्योत सिंग सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा आणि दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीचा वाद संपुष्टात येण्याचे नावच घेत नाहीय.

नवी दिल्ली - नवज्योत सिंग सिद्धू यांचा पाकिस्तान दौरा आणि दौऱ्यादरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा यांच्यासोबत झालेल्या गळाभेटीचा वाद संपुष्टात येण्याचे नावच घेत नाहीय. ''नवज्योतसिंग सिद्धू हे पाकिस्तानचे एजंट असून इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करत आहेत'',अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योतसिंग सिद्धू यांनी उपस्थिती दर्शवल्याबाबत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल  यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 

सिद्धू यांच्या रुपात पाकिस्तानला नवीन एजंट मिळाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान त्यांचा बोलक्या बाहुल्याप्रमाणे वापर करुन घेत आहेत आणि सिद्धू त्यांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, अशी बोचरी टीका हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. पाकिस्तानला जाऊन त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या. आता राहुल गांधी सिद्धूवर कारवाई करणार का?, असा प्रश्नही हरसिमरत कौर यांनी विचारला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी करतारपूर मार्ग खुला करण्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पहिले पाऊल उचलावे आणि पाकिस्तानशी चर्चा करावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर टीका केली. 'नवज्योतसिंग सिद्धू यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. पाकिस्तानने करतारपूर कॉरिडोरला हिरवा कंदील देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत भारत सरकारकडे पाकिस्तानने पत्रव्यवहारदेखील केलेला नाही, असा कौर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा