शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 5:28 PM

जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्काराचा एक जवान शहीद झाला आहे. नायक महेंद्र चेमजुंग असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.  

ठळक मुद्देपाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघनभारतीय लष्काराचा एक जवान शहीदभारतीय लष्कराकडून चोख प्रत्त्युत्तर

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्काराचा एक जवान शहीद झाला आहे. नायक महेंद्र चेमजुंग असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.  पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे सतत उल्लंघन होत आहे. काल पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करीत सीमावर्ती भागातील डझनभर गावांना लक्ष्य केले. यात तीन मुलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. मोहल्ला कस्बा येथील असरार अहमद आणि ढिगवारच्या करमा गावातील यास्मीन अख्तर अशी दोन मृतांची नावे आहेत. दरम्यान, आज जम्मू-काश्मीरच्या भिंबेर गाली सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात नायक महेंद्र चेमजुंग शहीद झाले. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्त्युत्तर दिले जात आहे. 

दुसरीकडे, श्रीनगरमधील सीमा सुरक्षा दलाच्या कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला. मंगळवारी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी श्रीनगर विमानतळाजवळील बीएसएफ कॅम्पमध्ये घुसले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र, भारतीय सुरक्षा दलाकडूनही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. जवान आणि दहशतवादी यांच्यात काही काळ चकमक सुरु होती. या  दहशतवादी हल्ल्यात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला. मात्र, भारतीय सुरक्षा दलाला तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान