पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन
By Admin | Updated: May 11, 2014 23:49 IST2014-05-11T23:49:55+5:302014-05-11T23:49:55+5:30
पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत असलेल्या भारतीय लष्करी चौक्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे.

पाकिस्तानकडून पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेलगत असलेल्या भारतीय लष्करी चौक्यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार करीत युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. भारतीय सैनिकांनीही पाकच्या या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. मागील १५ दिवसांत पाकिस्तानी सैनिकांनी युद्धबंदीचे उल्लंघन करण्याची ही पाचवी वेळ आहे. संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी शनिवारच्या रात्री १० वाजता पूंछ जिल्ह्याच्या नंगी टेकरी भागातील नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भारतीय सीमा चौक्यांवर गोळीबार केला. यावेळी भारतीय सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. गेल्या ५ मे रोजी पाकिस्तानी सैनिकांनी राजौरी जिल्ह्याच्या भीमबेर गली भागात, ३ मे रोजी मेंढार भागात, २८ एप्रिलला भीमबेर गली भागात आणि २५ एप्रिलला पूंछ जिल्ह्याच्या नियंत्रण रेषीवर गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था) दहशतवाद्यांना पाकव्याप्त काश्मिरातून भारतीय हद्दीत घुसविण्याच्या उद्देशाने पाकी सैनिक असे युद्धबंदीचे उल्लंघन करीत असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)