पाक, अफगाणमधील ४५,५२४ नागरिक भारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 04:49 IST2019-07-17T04:49:28+5:302019-07-17T04:49:33+5:30
पाकिस्तानमधील ४१,३३१ व अफगाणिस्तानमधील ४,१९३ नागरिक सध्या भारतात राहत आहेत.

पाक, अफगाणमधील ४५,५२४ नागरिक भारतात
नवी दिल्ली : पाकिस्तानमधील ४१,३३१ व अफगाणिस्तानमधील ४,१९३ नागरिक सध्या भारतात राहत असून, ते या दोन्ही देशांतल्या अल्पसंख्याक समुदायातील आहेत. ही माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत मंगळवारी दिली.
त्यांनी सांगितले की, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील सहा अल्पसंख्याक समुदायांना विलक्षण अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यापैैकी ४५,५२४ जण दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात राहात आहेत.
अशा लोकांसाठी दीर्घ मुदतीचा व्हिसा आॅनलाइन मिळविण्याकरिता २०१४ पासून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.