पाकची खुमखुमी संपता संपेना!

By Admin | Updated: October 23, 2016 01:20 IST2016-10-23T01:20:13+5:302016-10-23T01:20:13+5:30

जम्मू-काश्मीरच्या आर. ए. पुरा सेक्टर भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैन्याकडून शुक्रवारी रात्रीपासून गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. पाक रेंजर्स जोरदार गोळीबार करीत

Paki khumkumi end to end! | पाकची खुमखुमी संपता संपेना!

पाकची खुमखुमी संपता संपेना!

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या आर. ए. पुरा सेक्टर भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैन्याकडून शुक्रवारी रात्रीपासून गोळीबार व बॉम्बहल्ले सुरू आहेत. पाक रेंजर्स जोरदार गोळीबार करीत असून, बीएसएफचे जवान त्यांना चोख उत्तर देत आहेत.
हिरानगर सेक्टरमध्ये पाक रेंजर्सनी काल गोळीबार केला होता. त्याला भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात ७ पाक रेंजर्स व एक दहशतवादी मारले गेले होते. त्यानंतरही पाकिस्तानी सैन्याची खुमखुमी संपली नसून, त्यांनी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार आणि बॉम्बहल्ले सुरू केले. आमचे जवान त्यांना पूर्ण ताकदीनिशी उत्तर देत आहेत. गोळीबारात गावकरी जखमी होऊ नये, असे आमचे प्रयत्न असल्याचे बीएसएफचे महानिरीक्षक डी. के. उपाध्याय यांनी सांगितले.
ज्या सहा भागांमध्ये पाक सैन्याकडून गोळीबार, बॉम्बहल्ले सुरू आहेत, तेथील शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी शनिवारी एका पाकिस्तानी हेराला तर बारामुल्ला जिल्ह्यात जैश ए महम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दहतवाद्यांकडून एक एके४७ रायफल, एक पिस्तुल व काही स्फोटके, शस्त्रसाठा ताब्यात घेतला. हेराकडून सुरक्षा दलाच्या तैनातीची माहिती असणारे नकाशे व दोन सीम कार्ड्स जप्त केली आहेत. (वृत्तसंस्था)

सततच्या गोळीबारामुळे सीमारेषेजवळील गावकऱ्यांचे हाल सुरू आहेत. लोकांना जगणे कठीण झाले आहे. गावकऱ्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेकांना याआधीच सुरक्षित ठिकाणी हलवले आहे, अशी माहिती जम्मूचे पोलीस उपायुक्त सिमरनदीप सिंग यांनी दिली.

Web Title: Paki khumkumi end to end!