सीमेवर पाकची पुन्हा आगळीक

By Admin | Updated: April 16, 2016 03:16 IST2016-04-16T03:16:32+5:302016-04-16T03:16:32+5:30

जम्मू-काश्मीरच्या सांबा क्षेत्रात रिगल चौकीवर गोळीबार करून पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.

Paki again on the border | सीमेवर पाकची पुन्हा आगळीक

सीमेवर पाकची पुन्हा आगळीक

जम्मू: जम्मू-काश्मीरच्या सांबा क्षेत्रात रिगल चौकीवर गोळीबार करून पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
सांबाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक जोगिंदरसिंग यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी रात्री उशिरा २ वाजताच्या सुमारास सीमेवरील रिगल चौकीवर लहान शस्त्रांनी गोळीबाराच्या पाच ते सहा फैरी झाडल्या. परंतु यावेळी चौकीत तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरात कारवाई केली नाही.
यापूर्वी गेल्या रविवारी पाकिस्तानने पुंछ क्षेत्रात सुमारे सात महिन्यांच्या कालावधीनंतर उखळी तोफांचा मारा केला होता. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Paki again on the border