शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Brahmos Missile : ...म्हणून निशांत अग्रवालनं पाकिस्तानला दिली ब्रह्मोसची गोपनीय माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:11 IST

एटीएसच्या चौकशीतून महत्त्वपूर्ण माहिती समोर

नवी दिल्ली: डीआरडीओमध्ये कनिष्ठ अभियंता असलेल्या निशांत अग्रवालला सोमवारी अटक करण्यात आली. ब्रह्मोस क्षेपणास्त्राची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप निशांतवर आहे. निशांतला पाकिस्तान हस्तकाकडून 30 हजार अमेरिकन डॉलर महिना पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. कॅनडात गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळेल, असं प्रलोभन निशांतला दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे त्यानं ब्रह्मोस क्षेपणास्त्राबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप आहे. निशांत अग्रवाल सेजल कपूर नावाच्या एका कॅनडास्थित महिलेशी चॅट करायचा. निशांत फेसबुक आणि लिंक्डइनवरुन तिच्या संपर्कात असायचा. सेजलनं निशांतला लिंक्डइनवर येऊन संपर्क साधण्यास सांगितलं होतं. आपल्या वरिष्ठांशी निशांतला बोलता यावं यासाठी सेजलनं निशांतला लिंक्डइनवर आमंत्रित केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. निशांत सेजल कपूरसोबतच नेहा शर्मा नावाच्या महिलेशीदेखील चॅट करायचा. निशांत फेसबुकवरुन नेहाच्या संपर्कात होता. नेहा शर्माचं अकाऊंट पाकिस्तानमधलं आहे. निशांत आणखी कितीजणांशी संपर्क साधायचा आणि त्यानं नेमकी किती माहिती इतरांना दिली आहे, याचा तपास आता एटीएसकडून सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकानं सोमवारी नागपूरमधून निशांतला अटक केली. त्याच्या कॉम्युटरमध्ये संरक्षण क्षेत्राबद्दलची अतिशय संवेदनशील माहिती असल्याचं एटीएसच्या तपासात आढळून आलं आहे. निशांतला काल नागपूरच्या सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात गोपनीयतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.  

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसDefenceसंरक्षण विभागPakistanपाकिस्तानISIआयएसआयDRDOडीआरडीओ