पाकने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Admin | Updated: May 11, 2014 11:30 IST2014-05-11T11:30:23+5:302014-05-11T11:30:39+5:30
पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (लाईन ऑफ कंट्रोल)भारतीय चौक्यांवर हल्ला करत पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

पाकने पुन्हा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन
>ऑनलाइन टीम
जम्मू, दि. ११ - पाकिस्तानी सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (लाईन ऑफ कंट्रोल) भारतीय चौक्यांवर हल्ला करत पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने पाचव्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री पाक सैन्याने जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यातील नंगी तेकरी भागातील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पाकच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात कोणतीही जीवित हानी अथवा कोणीही जखमी झालेले नाही.
यापूर्वी पाकिस्तानी सैन्याने ५ मे रोजीही राजौरी जिल्ह्यात, त्यापूर्वी ३ मे रोजी पूँछ जिल्ह्यात, तर २८ एप्रिल रोजी राजौरी जिल्ह्यातील भीमबेर येथे गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते.