शीना बोरा जोड
By Admin | Updated: September 8, 2015 02:08 IST2015-09-08T02:08:32+5:302015-09-08T02:08:32+5:30

शीना बोरा जोड
>शीना बोरा हत्या - पॅकेज - जोडइंद्राणी व राय न्यायालयीन कोठडीत- खन्ना कोलकात्यातमुंबई : शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी व तिचा ड्रायव्हर श्याम रायची वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तसेच इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्नाने दिलेल्या माहितीची शाहनिशा करण्यासाठी त्याला कोलकाता येथे नेण्यात आल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले़या तिन्ही आरोपींची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना सोमवारी वांद्रे महानगर दंडाधिकारी जी़ आऱ तौर यांच्यासमोर हजर करण्यात आले़ इंद्राणी व रायच्या कोठडीची आवश्यकता नसल्याचे विशेष सरकारी वकील वैभव बगाडे यांनी न्यायालयासमोर सांगितले. तर, खन्नाने दिलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी त्याला सकाळी विमानाने कोलकाता येथे नेण्यात आले.मंगळवारी त्याला परत मुंबईत आणल्यानंतर न्यायालयात हजर केले जाईल़ अथवा तेथेच कोलकाता येथील न्यायालयात हजर केले जाईल़ यासाठी त्याच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करावी, अशी मागण ॲड़ बगाडे यांनी केली़याला खन्नाच्या वकिलाने विरोध केला़ तर न्यायालयाने खन्नाच्या अनुपस्थितीत कोणतेही आदेश जारी करण्यास नकार दिला आणि इंद्राणी व रायची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़इंद्राणीच्या वकील गुंजन मंगला यांनी तिला कारागृहात घरचे जेवण देण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली़ त्यावर येत्या गुरूवारी सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले़