शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित मजुरांच्या वेदना शब्दातीत; ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 06:44 IST

कोरोना विषाणूविरोधातील आमचा संघर्ष हा दीर्घ काळ चालणारा आहे. ही आपत्ती, या अरिष्टावर संपूर्ण जगात नेमका उपाय उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाने गरीब आणि मजुरांना मोठा फटका बसला असून त्यांच्या वेदना शब्दांत सांगता येणाऱ्या नाहीत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

मोदी त्यांच्या दर महिन्याच्या ‘मन की बात’ या रेडिओवरील कार्यक्रमात रविवारी म्हणाले की, ‘‘कोविड-१९ महामारीचा फटका सगळ्या थरांतील लोकांना बसला; परंतु गरीब त्यात कमालीचे भरडून निघाले. आमची खेडी, गावे, जिल्हे आणि राज्ये स्वावलंबी असती तर आज आम्ही ज्या प्रमाणात प्रश्नांना तोंड देत आहोत तेवढी वेळ आली नसती.’’ गरीब, मजुरांना मदत करण्यासाठी प्रत्येक जण काम करीत आहे, असे सांगून मोदी यांनी रेल्वेने स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे जे काम केले त्याचा आवर्जून उल्लेख केला.

कोरोना विषाणूविरोधातील आमचा संघर्ष हा दीर्घ काळ चालणारा आहे. ही आपत्ती, या अरिष्टावर संपूर्ण जगात नेमका उपाय उपलब्ध नाही. या अरिष्टाचा यापूर्वी अनुभवही नाही. आम्ही अगदीच नव्या आव्हानांना आणि त्यातून येणाºया कठीण स्थितीला तोंड देत आहोत, असे मोदी म्हणाले. सगळे देश कोरोना विषाणूमुळे ज्या प्रश्नांना तोंड देत आहेत तसेच भारताबाबतही आहे. देशातील एकही भाग असा नाही की ज्याला कोरोनामुळे त्रास झाला नाही. हा त्रास खूप खोलवर झाला तो कोणतेही संरक्षण नसलेले मजूर आणि कामगारांना. त्यांचे दु:ख, त्यांच्या वेदना, त्यांनी भोगलेली कठीण परिस्थिती ही शब्दांत सांगता येणारी नाही. हे मजूर, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय आज जे भोगत आहेत ते आम्ही समजून घेऊ शकणार नाही, असे मोदी म्हणाले.

मला सेवा करण्याची संधी या देशाने दिल्यापासून आम्ही पूर्व भारताच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. गेल्या काही वर्षांत याबाबत बरेच काम झाले आहे व त्याचे मला खूप समाधान आहे आणि आता स्थलांतरित कामगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी नव्या उत्तराची गरज आहे आम्ही त्या दिशेने अथकपणे काम करीत आहोत, असे मोदी म्हणाले.मजूर, कामगारांमधील कौशल्येही शोधली जात असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी