आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 06:33 IST2025-04-25T06:32:35+5:302025-04-25T06:33:00+5:30

स्थानिक लोकांनी पर्यटकांना आश्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या संकटाच्या काळात काश्मिरींनी पर्यटकांची अतिरिक्त देखभाल करून आपलेसे केले आहे. 

Pahalgam Terror Attack: We are always with you... Despite the terror, the influx of tourists from all over the country continues in Kashmir! | आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 

आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 

जम्मू - पहलगाममधील हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राने व देशभरातील पर्यटकांनी अत्यंत लवचीकपणा दाखवला आहे. हल्ल्यानंतरही हजारो पर्यटक काश्मीरचे प्रसिद्ध टूरिस्ट स्पॉट पाहण्यासाठी येत आहेत.

सोनमर्गपासून दूधपथरी व गुलमर्गच्या बर्फाच्छादित भागांपर्यंत पर्यटकांचा ओघ मोठ्या संख्येने सुरूच आहे. यामुळे येथील पर्यटनाबाबत व्यक्त करण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणावरील चिंता बाजूला सारल्या गेल्या आहेत. पर्यटन संचालक राजा याकूब यांनी सांगितले की, आमच्याकडे आजही श्रीनगरमध्ये १,३०० पेक्षा जास्त पर्यटक आहेत. काल गुलमर्गमध्ये ५,००० पेक्षा जास्त लोकांनी गंडोलाची सवारी केली. 

स्थानिक काळजी घेत आहेत
सोनमर्गमधील एक पर्यटक प्रेरणा राजपूत यांनी सांगितले की, स्थानिक लोक, आम्ही व्यवस्थित आहोत की नाही? आम्हाला काही हवे-नको, याची ते  काळजी घेत आहेत. असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ दिली नाही.

देखभाल करून आपलेसे केले
हल्ल्यानंतरही बुकिंग कायम असल्याचे टूर ऑपरेटर्सनी सांगून वरील दाव्याला दुजोरा दिला. एका प्रमुख पर्यटन हितधारकाने सांगितले की, कॅब आजही पर्यटकांना लोकप्रिय ठिकाणी घेऊन जात आहेत. पर्यटक नेहमीप्रमाणे सोनमर्ग, दूधपथरी व गुलमर्गकडे जात आहेत. महामार्ग बंद असल्यामुळे विमानतळांवर गर्दी होती, असे त्यांचे म्हणणे आहे. एक महत्त्वाची बाब म्हणजे स्थानिक लोकांनी पर्यटकांना आश्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला आहे. या संकटाच्या काळात काश्मिरींनी पर्यटकांची अतिरिक्त देखभाल करून आपलेसे केले आहे. 

Web Title: Pahalgam Terror Attack: We are always with you... Despite the terror, the influx of tourists from all over the country continues in Kashmir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.