जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 16:40 IST2025-04-28T16:39:41+5:302025-04-28T16:40:19+5:30
विनयला नेहमीच देशसेवेची ओढ होती. शहीद विनय यांना पूर्ण सन्मान मिळावा इतकीच माझी इच्छा आहे असं पत्नी हिमांशी यांनी माध्यमांना सांगितले.

जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
चंदीगड - पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टिनंट विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर घटनेचा खुलासा केला आहे. पतीला गोळी लागल्यानंतर जवळपास दीड तासाने त्यांना हॉस्पिटलला नेण्यात आले. आम्ही हिंदू आहोत हे कळल्यानंतर त्याने पतीला गोळीला झाडली. तू असं का केलेस हे विचारले असता तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. पोलिसांना आमच्यापर्यंत पोहचण्यासाठी एक तास लागला. कुणीही मदत केली नाही. अखेर दीड तासांनी पतीवर पहलगामच्या एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा भारतीय सैन्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असं सांगितल्याची माहिती शहीद विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी यांनी दिली आहे.
शहीदाची पत्नी हिमांशी यांनी सांगितले की, जेव्हा मी ५-१० मिनिटांनी हॉस्पिटलला पोहचले तेव्हा माझ्या पतीला श्रीनगरला शिफ्ट केल्याचे सांगण्यात आले. मी तिथल्या जवानांना मला सोबत का घेऊन गेले नाहीत असा सवाल केला त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्याचं त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर भारतीय सैन्याने मला पहलगामच्या क्लबला नेले. तिथे आर्मी हेडक्वार्टरचा फोन आला. मला श्रीनगरला नेण्यात आले. विनयला नेहमीच देशसेवेची ओढ होती. शहीद विनय यांना पूर्ण सन्मान मिळावा इतकीच माझी इच्छा आहे असं पत्नी हिमांशी यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान, लेफ्टिनंट विनय नरवाल आणि त्यांची छोटी बहीण सृष्टी दोघेही नर्सरी क्लासपासून एकाच शाळेत शिकले आहेत. विनयने दहावीच्या बोर्डात टॉप केले होते. आमच्या शाळेच्या क्विज, स्पोर्टंसमध्येही तो कायम पुढे असायचा. जेव्हा कधी आम्ही त्याच्या इच्छा विचारायचो तेव्हा संरक्षण दलात जायचं स्वप्न असल्याचे तो सांगायचा. शाळेला कायम त्याचा गर्व आहे असं विनय यांच्या शाळेतील संचालिका निर्मलाजीत चावला यांनी सांगितले.
७ दिवसांपूर्वीच झालं होते लग्न
२६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. हनीमूनसाठी ते पहलगामला गेले होते. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.