शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 21:32 IST

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे.

Pahalgam Terror Attack :जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी(22 एप्रिल) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश संतप्त आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत काँग्रेससह सर्व पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर संपूर्ण विरोधी पक्ष सरकारसोबत असल्याचे सांगितले. पण, आता काँग्रेसने या हल्ल्याबाबत सरकारला सहा प्रश्न विचारले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करणारा व्हिडिओ काँग्रेसने पोस्ट केला आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे, असे त्यात म्हटले आहे. पण, असे काही प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे देशातील लोकांना हवी आहेत. 

काँग्रेसने सरकारला विचारले हे 6 प्रश्न

  1. सुरक्षेत चूक कशी झाली?
  2. गुप्तचर यंत्रणा अपयशी का ठरली?
  3. दहशतवादी सीमेवरुन कसे घुसले?
  4. 28 लोकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?
  5. गृहमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देणार का?
  6. या चुकीची जबाबदारी पंतप्रधान मोदी घेतील का?

28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार ?व्हिडिओमध्ये पुढे म्हटले की, जर नोटाबंदीने दहशतवाद संपणार होता, तर अशी परिस्थिती कशी निर्माण झाली? 28 लोकांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे? गृहमंत्री त्यांचे अपयश स्वीकारुन राजीनामा देतील का? पंतप्रधान इतर सर्व गोष्टींचे श्रेय घेतात, त्याप्रमाणे या हल्ल्याची जबाबदारी घेतील का? असे प्रश्न काँग्रेसने विचारले आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर