शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:53 IST

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. गेल्या 24 तासांत ज्या घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे हा संशय बळावला आहे. असे म्हटले जात आहे की, भारत पूर्वीप्रमाणेच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सीमापार मोठी मोहीम राबवू शकतो. 2016 आणि 2019 मध्ये दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केले. दोन्ही सर्जिकल स्ट्राईकमध्ये 500 हून अधिक पाकिस्तानी दहशतवादी मारले गेले होते.

पाकिस्तानवर कारवाईचे 4 संकेत

1. गृहमंत्री शाह यांची उच्चस्तरीय बैठकदहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा तात्काळ काश्मीर खोऱ्यात पोहोचले. शाह स्वतः या संपूर्ण प्रकरणावर जातीने लक्ष ठेवत असून, घटनास्थळांना भेटी देत आहेत. काश्मीरमध्ये शाहांनी एलजी मनोज सिन्हा आणि वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. बैठकीनंतर शाह म्हणाले की, कोणत्याही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही. हा देश दहशतवादासमोर कधीही झुकणार नाही.

2. पंतप्रधान मोदी दुसऱ्या मार्गाने आलेपहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. मोदींनी त्यांचा तिथला दौरा रद्द केला आणि लगेच भारतात परतले. अहवालानुसार पंतप्रधान पाकिस्तानच्या हवाई हद्दीऐवजी दुसऱ्या मार्गाने दिल्लीला आले. मोदींच्या या पावलाकडे पाकिस्तानला थेट इशारा म्हणून पाहिले जात आहे. पंतप्रधान दिल्लीत सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक घेतील. सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती ही सर्वोच्च पातळीची समिती आहे. यामध्ये सुरक्षेशी संबंधित प्रमुख निर्णय घेतले जातात.

3. तिन्ही दल सज्ज, संरक्षणमंत्र्यांनी घेतली बैठकपहलगाम घटनेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. या बैठकीत तिन्ही लष्कर प्रमुखांना सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याचाच अर्थ सरकार एखाद्या मोठ्या कारवाईच्या तयारीत आहे. गेल्या वेळी हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. 

4. पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरणपाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर भारताने हल्ला केला तर येथील सर्व पक्ष एकत्रितपणे त्याचा विरोध करतील, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री चौधरी फवाद हुसेन यांनी एका निवेदनात म्हटले आहे. फवाद यांच्या आधी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या हल्ल्यात पाकिस्तानचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले. सॅटेलाईट रिपोर्टनुसार, कालच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाची विमाने रात्रभर पाकिस्तान सीमेभोवती गस्त घालत होती. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारतPakistanपाकिस्तान