शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 18:39 IST

Pahalgam Terror Attack : 'भारताने केलेली कारवाई पाकिस्तान कधीच विसरू शकणार नाही.'

Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेच, शिवाय पाकिस्तानी सैन्यालाही गुडघे टेकायला भाग पाडले. आता त्या कारवाईच्या सुमारे १ महिन्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर युरोपच्या दौऱ्यावर गेले आहेत. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्समधून जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा कडक शब्दात इशारा दिला. भारताला पुन्हा दहशतवादी हल्ल्यांची चिथावणी दिली, तर आम्ही पाकिस्तानात घुसून मोठा हल्ला करू, असा धमकी वजा इशारा परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करूभारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ब्रुसेल्समध्ये बोलताना म्हणाले की, पाकिस्तान हजारो दहशतवाद्यांना उघडपणे प्रशिक्षण देतो आणि त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी पाठवतो. भारत यापुढे हे अजिबात सहन करणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा संदर्भ देत एस जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, जर त्यांनी एप्रिल महिन्यात केलेली क्रूर कृत्ये थांबवली नाहीत, तर त्यांना भारताकडून प्रत्युत्तराला सामोरे जावे लागेल. दहशतवादी पाकिस्तानच्या आत असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या आत खोलवर जाऊ.

पुन्हा युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे का?परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पुढे म्हटले की, संघर्षाची मूळ कारणे अजूनही तशीच आहेत. पाकिस्तान हा असा देश आहे, जो दहशतवादाचा वापर साधन म्हणून करतो. यावेळी जयशंकर यांना विचारण्यात आले की, भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध होऊ शकते का? यावर ते म्हणाले, पाकिस्तानने दहशतवादी कारवाया थांबवल्या नाही, तर निश्चितच होऊ शकते. 

ब्रुसेल्समध्ये जयशंकर यांना ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताला झालेल्या नुकसानीबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर जयशंकर म्हणाले की, भारताच्या लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानी हवाई दलाचे बरेच जास्त नुकसान झाले आहे. याच कारणामुळे पाकिस्तानला भारतासमोर युद्धविरामासाठी हात जोडावे लागले. राफेल विमानांनी केलेली कारवाई किती यशस्वी झाली, याचा पुरावा पाकिस्तानचे नष्ट झालेले हवाई तळ आहेत, असेही ते यावळी म्हणाले. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकरNarendra Modiनरेंद्र मोदी