दहशतवाद्यांना टिपण्यासाठी आता ‘ध्रुव’ उतरणार थेट काश्मिरात; संरक्षण खात्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:44 IST2025-04-26T07:43:29+5:302025-04-26T07:44:09+5:30

काश्मीरमधील छुप्या दहशतवादी कारवायांवर बारीक नजर ठेवण्यासाठी लष्कराला ॲडव्हांस लाइट हेलिकॉप्टर ध्रुवचा वापर करण्याची परवानगी दिली आहे.

Pahalgam Terror Attack: 'Dhruv' will now land directly in Kashmir to catch terrorists; Defense Ministry gives permission | दहशतवाद्यांना टिपण्यासाठी आता ‘ध्रुव’ उतरणार थेट काश्मिरात; संरक्षण खात्याची परवानगी

दहशतवाद्यांना टिपण्यासाठी आता ‘ध्रुव’ उतरणार थेट काश्मिरात; संरक्षण खात्याची परवानगी

चंद्रशेखर बर्वे

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जागे झालेल्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला ध्रुव हेलिकॉप्टर वापरण्याची परवानगी दिली आहे. काश्मिरातील दहशतवादी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी या हेलिकॉप्टरचा उपयोग होणार आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या भागात जवानांची तैनाती असती तर लोकांचा बळी गेला नसता ही वस्तुस्थिती आहे. संरक्षण मंत्रालयाने काश्मीरमधील छुप्या दहशतवादी कारवायांवर बारीक नजर ठेवण्यासाठी लष्कराला ॲडव्हांस लाइट हेलिकॉप्टर ध्रुवचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे.

डोंगराळ प्रदेशात ऑपरेशन करण्यात आहे सक्षम
ध्रुव हेलिकॉप्टर डोंगराळ प्रदेशात ऑपरेशन करण्यात सक्षम आहे. सशस्त्र सेना आणि तटरक्षक दलाकडून या हेलिकॉप्टरचा उपयोग केला जातो. लष्कराकडे १८० ध्रुव हेलिकॉप्टरसह अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज ६० रुद्र हेलिकॉप्टर आहेत. गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर कोस्ट गार्ड एएलएच एमके ३ च्या भीषण अपघातानंतर सर्व ध्रुव हेलिकॉप्टर बेड्यात ठेवण्यात आले होते. 

Web Title: Pahalgam Terror Attack: 'Dhruv' will now land directly in Kashmir to catch terrorists; Defense Ministry gives permission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.