शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:30 IST

बंगळुरु येथील एका व्यक्तीचा पहलगाम हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. विविध राज्यातील हे सर्व पर्यटक होते. दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारुन पर्यटकांवर गोळ्या चालवण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांनी पुरुषांना लक्ष्य केले आणि महिला, मुलांना सोडून दिले. या हल्ल्यात कर्नाटकातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. कर्नाटकच्या शिवमोग्गा येथील रहिवासी मंजुनाथ राव आणि बंगळुरू येथील भरत भूषण अशी या मृतांची नावे आहेत.

भरत भूषण हे त्यांची पत्नी सुजाता आणि तीन वर्षांच्या मुलासोबत पहलगाममधील बेसरन परिसरात फिरायला गेला होते. त्यानंतर अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांकडून भरत यांच्यावर अगदी जवळून गोळीबार करण्यात आला. त्यांची पत्नी आणि मुलगा कसेतरी बचावले. भरत भूषण आणि त्यांचे कुटुंब १८ एप्रिल रोजी एका टूर ऑपरेटरमार्फत काश्मीरला गेले होते. ते पूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. सध्या ते डायग्नोस्टिक्स म्हणूने काम करत होते.

या घटनेनंतर भूषण यांच्या सासू विमला यांनी घटनेची माहिती दिली. "माझ्या मुलीने फोन करून आम्हाला याबाबत कळवले. ती एका आयटी कंपनीत काम करायची. तिच्या लग्नाला पाच वर्षे झाली होती. तिने फोन केल्यावरच आम्हाला काय घडले ते कळालं. दहशतवाद्यांनी भरतला त्याचे आधार कार्ड दाखवण्यास सांगितले आणि ते तपासल्यानंतर त्याला मारण्यात आले. दहशतवाद्यांनी 'तुम्ही मुस्लिम आहात की हिंदू? असे विचारले आणि मग मारले. माझ्या जावयाकडे बाळ होते. त्यांनी बाळाला खाली ठेवायला लावले आणि मग जावयावर गोळ्या झाडल्या," असे विमला यांनी सांगितले.

"दहशतवाद्यांनी भारतला जर तू मुस्लिम आहेस तर आम्ही तुला सोडून देऊ असे म्हटलं. पण भरतने आधीच सांगितले गेले होते की तो हिंदू आहे, त्यामुळे मी मुस्लीम आहे असं तो कसं म्हणू शकत होता. हिंदू असल्याची खात्री केल्यानंतर त्यांनी जावयाच्या डोक्यात गोळी झाडली. ते तीन मिनिटे त्याच्यावर गोळीबार करत राहिले. तो मरेपर्यंत ते थांबले नाहीत. ते नावावरून ओळखू शकत होते. सर्व कागदपत्रे दाखवल्यानंतरही त्यांनी त्याला मारले," असेही विमला यांनी म्हटलं.

दरम्यान, शिवमोग्गा येथील मंजुनाथ राव देखील त्यांच्या पत्नी आणि मुलासह पहलगाममध्ये गेले होते. ते रिअल इस्टेट व्यापारी होते. या हल्ल्यात त्यांनाही आपला जीव गमवावा लागला.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाBengaluruबेंगळूरTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर