शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
2
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
3
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
4
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
5
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
6
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
7
मासेमारी करताना समुद्रात पडला खलाशी; ४ दिवसांनी मध्यरात्री 'असं' काय घडलं, कुटुंबाला बसला शॉक
8
पुण्यात 'पाताळ लोक' तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला अख्खा प्लॅन
9
"भाजपा कधीच मुस्लीम विरोधी नाही"; अकोटमधील AIMIM सोबत युतीवर BJP आमदाराचा पुन्हा ट्विस्ट
10
Maharashtra Government: सर्व पक्षांच्या प्रतोदांची पॉवर वाढली! आता थेट मंत्रिपदाचा दर्जा; अलिशान सुविधाही मिळणार
11
रक्षकच बनला भक्षक! चालत्या गाडीत पोलिस निरीक्षकाचा 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
12
Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; ४ जण ठार, ६ गंभीर जखमी
13
Shirdi Crime: 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात चकमक; सुरक्षा दलांनी घनदाट जंगलात दहशतवाद्यांना घेरले
15
AIMIM सोबत युती भोवणार, भाजपा आमदाराला पक्षाची नोटीस; "पक्षाच्या ध्येय धोरणाला सुरंग लावला..."
16
Plastic Water Bottle: गाडीत ठेवलेल्या बाटलीतील पाणी पिता का? तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा!
17
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तान बिथरला; युद्ध रोखण्यासाठी ६० वेळा अमेरिकेला विनवणी, मग ४५ कोटी...
18
"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले
19
किंग कोहलीभोवती चाहत्यांचा गराडा; 'विराट' गर्दीतून कसा बसा कारपर्यंत पोहोचला! व्हिडिओ व्हायरल
20
बापाचे काबाडकष्ट! १५ वर्षे दोन नोकऱ्या करून लेकीला दिलं शिक्षण; सर्वत्र होतंय भरभरून कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:00 IST

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pahalgam Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाच महिन्यांनंतर सुरक्षा दलांना गेल्या आठवड्यात एक मोठे यश मिळाले. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या काश्मीरमधील कुलगाम येथील रहिवासी मोहम्मद युसूफ कटारी याला सुरक्षा दलांनी अटक केली.  २६ वर्षीय या तरुणावर दहशतवाद्यांना रसद पुरवल्याचा आरोप आहे, ज्यामुळे बारसन व्हॅलीमध्ये २६ निष्पाप पर्यटकांची निर्घृण हत्या झाली. अटकेनंतर युसूफला १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. आता युसूफ कटारीच्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे.

पहलगाम हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा सहकारी मोहम्मद युसूफ कटारी याने अनेक खुलासे केले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटारीने चौकशीदरम्यान कबूल केले की तो दहशतवाद्यांना चार वेळा भेटला  आणि त्यांना मोबाईल चार्जरही पुरवत होता. पोलिसांनी २४ सप्टेंबर रोजी कटारीला अटक केली. कटारी हा कुलगामचा रहिवासी आहे. कटारीने हल्ला करणाऱ्या द रेझिस्टन्स फ्रंटच्या दहशतवाद्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला होता.

ऑपरेशन महादेव दरम्यान जप्त केलेल्या वस्तूंच्या चौकशीतून कटारीची अटक झाली. जूनच्या सुरुवातीला, राष्ट्रीय तपास संस्थेने परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांना अटक केली होती. तपासात लष्कर कमांडर सुलेमान शाह, अफगाण आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. २८ जुलै रोजी ऑपरेशन महादेवमध्ये हे तीन दहशतवादी मारले गेले होते. मोहम्मद युसूफ कटारीने दहशतवाद्यांना अँड्रॉइड फोन चार्जर पुरवला होता, जो त्याच्याविरुद्ध महत्त्वाचा पुरावा ठरला आणि त्याला अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान अर्धवट नष्ट झालेल्या अँड्रॉइड मोबाईल फोन चार्जरची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी कटारीवर लक्ष केंद्रित केले. श्रीनगर पोलिसांनी अखेर चार्जरचा मूळ मालक शोधून काढला ज्याने   फोन एका डीलरला विकला होता. ही माहिती हळूहळू पोलिसांना कटारीपर्यंत घेऊन गेली. कटारी उंच भागात भटक्या विद्यार्थ्यांना शिकवत असे.

पहलगाम हल्ल्याच्या दोन महिन्यांनंतर २३ जून रोजी एनआयएने पहलगाममधून दोन जणांना अटक केली होती. एनआयएच्या तपासात या दोघांनी हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. परवेझ आणि बशीर यांनी हल्ल्यापूर्वी जाणूनबुजून तिन्ही दहशतवाद्यांना हिल पार्कमधील एका तात्पुरत्या झोपडीत ठेवले होते. त्यांनी त्यांना जेवण आणि इतर सुविधा पुरवल्या होत्या.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धार्मिक ओळखीच्या आधारे लक्ष्य केले. ही घटना पहलगाम शहरापासून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बायसरन खोऱ्यात घडली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Burnt Charger Leads to Arrest in Pahalgam Attack Assistance Case

Web Summary : Mohammad Yusuf Katari was arrested for aiding terrorists in the Pahalgam attack. He provided logistical support, including phone chargers, to The Resistance Front militants. The burnt charger was crucial evidence. NIA had previously arrested two others for sheltering the attackers.
टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरJammu Kashmirजम्मू-काश्मीर