उत्तर प्रदेशातील ग्राउंड रिपोर्ट पाहिल्यास, समाजवादी पक्ष आणि बसपाने भाजपसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. अनेक जागांवर दोन्ही पक्ष भाजपपेक्षा मजबूत आहेत. सपा, बसपाच्या जातीच्या समीकरणांना शह देण्यासाठी भाजपने लोकसभा निवडणूक मोदीविरुद्ध इतर अशी केली आहे ...
काळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदी होती, तर मग बँकेच्या रांगेत गरीब शेतकरी का होता, चोर का नव्हते, असा सवाल राहुल यांनी उपस्थित केला. मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून आपल्या निवडक १५ मित्रांचे खिसे भरल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. ...
नोटाबंदी, जीएसटीमुळे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच विरोधी पक्षांनी बनविला आहे. ...
सुनिता केजरीवाल यांच्याकडे दिल्लीचा,गाझियाबाद आणि उत्तर कोलकाताच्या या तीन ठिकाणचे मतदान ओळखपत्र असल्याचे आरोप खुराना यांनी केला आहे. दुसऱ्याला बोट दाखवण्याच्या आधी स्वतः आधी बरोबर आहे का याची खात्री करावी असा टोला सुद्धा हरीश खुराना यांनी लगावला. ...
पक्षाला तिकीट वितरीत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र यासाठी एक पद्धत असते. परंतु, ज्या पद्धतीने भाजपकडून आपल्याला वाऱ्यावर सोडण्यात आले, त्यामुळे आपल्याला फार दु:ख झाल्याचे कविता खन्ना यांनी नमूद केले. ...
आपण महिलांबद्दल संवेदनशीलता दाखवली पाहिजे. प्रज्ञा सिंह यांच्या मनात दुख: आहे त्यामुळेच त्यांनी हेमंत करकरे यांच्याबद्दल असे विधान केले असावे. वादग्रस्त विधानाबद्दल रामदेवबाबांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर दिले. ...
काँग्रेस नेते आणि बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी देशाच्या स्वातंत्र्यात आणि विकासात जिनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचं म्हटलं होतं. आपण चुकून असं म्हटल्याची माहिती शत्रुघ्न सिन्हा यांनीच दिली आहे. ...