गेली पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना खोटी आश्वासने देत आले आहेत. त्यामुळे ते खोट्या आश्वासनांच्या लाटेमध्येच बुडतील, असे उद्गार माजी क्रिकेटपटू, पंजाबचे मंत्री, काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सोमवारी काढले. ...
काँग्रेसच्या पतियाळातील प्रचार सभेत व्यासपीठावरूनच अचानक अकाली दल जिंदाबादच्या घोषणा सुरू होताच श्रोते व काँग्रेस कार्यकर्ते गोंधळून गेले. काँग्रेसच्या उमेदवार व मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परणीत कौर येथील उमेदवार आहेत. ...
भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) २२ मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-२ बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे. ...
बिहारमधील मुजफ्फरपूर येथील निवारागृहात (शेल्टर होम) ११ मुलींच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय गुप्तचर खात्याला तो करीत असलेल्या या प्रकरणाचा अहवाल तीन जूनपर्यंत सादर करण्यास सोमवारी सांगितले. ...
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता. ...