पान 9 : कासारवर्णेतील सातेरी महादेव देवस्थानची समिती बरखास्त
By Admin | Updated: August 14, 2015 22:54 IST2015-08-14T22:54:10+5:302015-08-14T22:54:10+5:30
हणखणे : कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थानची विद्यमान समिती पेडणे उपजिल्हाधिकार्यांनी बरखास्त केली आहे. उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी काढलेल्या आदेशाद्वारे समिती बरखास्त केल्यानंतर प्रशासक अधिकारी म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची नेमणूक केली. आजगावकर हे दि. 15 रोजी दुपारी 3 वाजता आपला पदाचा ताबा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. कासारवर्णे येथील रामा नारायण नाईक व इतरांनी देवस्थान कमिटीविरुद्ध मामलेदारांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन मामलेदार पेडणे यांनी कमिटीचा अहवाल उपजिल्हाधिकार्यांना सादर केला. त्यानुसार त्यांनी कासारवर्णे देवस्थान कमिटी बरखास्त करण्याचा आदेश दिला. मामलेदार राजेंद्र आजगावकर यांनी शुक्रवारी सकाळी सातेरी मंदिर परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत कासारवर्णे पंचायतीचे तलाठी, मामलेदार, कार्यालयीन कर्मचार

पान 9 : कासारवर्णेतील सातेरी महादेव देवस्थानची समिती बरखास्त
ह खणे : कासारवर्णे-पेडणे येथील सातेरी महादेव देवस्थानची विद्यमान समिती पेडणे उपजिल्हाधिकार्यांनी बरखास्त केली आहे. उपजिल्हाधिकारी नारायण गाड यांनी काढलेल्या आदेशाद्वारे समिती बरखास्त केल्यानंतर प्रशासक अधिकारी म्हणून मामलेदार राजेंद्र आजगावकर यांची नेमणूक केली. आजगावकर हे दि. 15 रोजी दुपारी 3 वाजता आपला पदाचा ताबा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. कासारवर्णे येथील रामा नारायण नाईक व इतरांनी देवस्थान कमिटीविरुद्ध मामलेदारांकडे तक्रार केली होती. याची दखल घेऊन मामलेदार पेडणे यांनी कमिटीचा अहवाल उपजिल्हाधिकार्यांना सादर केला. त्यानुसार त्यांनी कासारवर्णे देवस्थान कमिटी बरखास्त करण्याचा आदेश दिला. मामलेदार राजेंद्र आजगावकर यांनी शुक्रवारी सकाळी सातेरी मंदिर परिसराची पाहणी केली. त्यांच्यासोबत कासारवर्णे पंचायतीचे तलाठी, मामलेदार, कार्यालयीन कर्मचारी धावरे उपस्थित होते. शनिवार, दि. 15 रोजी उपजिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार मामलेदार आजगावकर कासारवर्णे सातेरी महादेव देवस्थानचा प्रशासकीय अधिकारी म्हणून ताबा घेणार आहेत, अशी माहिती मामलेदार कार्यालयाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)