पान 7 : चोडण फेरी धक्क्यावर शेवाळाचा धोका
By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:48+5:302015-09-03T23:05:48+5:30
- प्रवासी वाहनांसह घसरून पडू लागल्याने घबराट

पान 7 : चोडण फेरी धक्क्यावर शेवाळाचा धोका
- ्रवासी वाहनांसह घसरून पडू लागल्याने घबराटतिसवाडी : चोडण-रायबंदर जलमार्गावरील फेरी धक्क्यावर शेवाळ निर्माण झाल्याने येथे अनेक प्रवासी घसरून पडल्याने त्यांना इजा झाली आहे. सर्वांत धोकादायक बाब म्हणजे, दुचाकी वाहनेही या शेवाळावरून घसरत असल्यामुळे प्रवाशांनी या प्रकाराचा मोठा धसका घेतला आहे. या धक्क्यावरील शेवाळ त्वरित काढावे, अशी जोरदार मागणी येथील प्रवाशांकडून करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या फेरी धक्क्यावरील शेवाळाचे प्रमाण वाढलेले असल्याने चोडण व रायबंदर हे दोन्ही धक्के प्रवाशांसाठी धोकादायक ठरले आहेत. खास करून ओहोटीच्या वेळी प्रवाशांना हे धक्के धोकादायक ठरत आहेत. या मार्गावरील अनेक समस्यांमुळे येथील प्रवासीवर्ग नाराज आहे. या मार्गावर जुन्या फेरीबोटी ठेवल्याने त्या वारंवार नादुरुस्त होतात. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी तर या फेरीबोटी अतिशय डोकेदुखी ठरल्या आहेत. संध्याकाळी गर्दीच्या वेळी रायबंदर धक्क्यावर एवढी गर्दी असते की, दुचाकीचालक फेरीबोटीतील वाहने काढण्यास मार्गच देत नाहीत. हा प्रकार लक्षात घेऊन येथे पोलीस बंदोबस्त ठेवल्यास काही प्रमाणात शिस्त निर्माण होऊ शकते; पण नदी परिवहन खात्याच्या दुर्लक्षतेमुळे हा मार्ग प्रवाशांना नेहमीच डोकेदुखीचा ठरला आहे. गुरुवारी सकाळी 7 वाजता आग्वाद नावाची फेरीबोट बंद पडल्याने येथील प्रवाशांचे खूप हाल झाले. (प्रतिनिधी) कॅप्शन फोटो : चोडण फेरी धक्क्यावर शेवाळ निर्माण झाल्याने एक दुचाकीस्वार घसरला. वर येण्यासाठी त्याला अन्य एक प्रवाशाने मदत केली. (छाया- र्शीकृष्ण हळदणकर)