पान ७ - कुडचडेत आरोग्य शिबिर
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:15+5:302015-07-22T00:34:15+5:30
कुडचडे : गोवा पंचायत महिला शक्ती अभियानामार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कुडचडे येथील सवार्ेदय सभागृहात घेण्यात आले. शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, गोविंद गावकर, संतोष पेडणेकर उपस्थित होते.

पान ७ - कुडचडेत आरोग्य शिबिर
क डचडे : गोवा पंचायत महिला शक्ती अभियानामार्फत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कुडचडे येथील सवार्ेदय सभागृहात घेण्यात आले. शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या वेळी सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई, गोविंद गावकर, संतोष पेडणेकर उपस्थित होते.या वेळी बोलताना आमदार फळदेसाई म्हणाले, उघड्यावर ठेवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे नेहमीच आरोग्याला घातक असतात. या पदार्थांमुळे शरीरामध्ये बरेचसे आजार उद्भवू शकतात त्यामुळे असे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळले पाहिजेत. शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी समाधानी राहिले पाहिजेत. ग्रामीण भागातील महिलावर्ग हा आरोग्याविषयी जागृत आहेत. आरोग्य शिबिराला या वर्गातील महिला सहभाग मोठ्या प्रमाणावर असतो.डायबेटीससारख्या आजारामुळे शरीरातील किडणी खराब होण्याची शक्यतासुध्दा नाकारता येत नाही. नागरिकांनी याबाबत गंभीर राहाणे अत्यंत गरजेचे आहे. या वेळी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. (प्रतिनिधी)