पान 6- फोंड्यात सम्राट संगीत संमेलनाचे उद्घाटन

By Admin | Updated: December 13, 2015 00:07 IST2015-12-13T00:07:35+5:302015-12-13T00:07:35+5:30

फ ोंडा : गोव्यातील लोकांचे आणि संगीताचे पूर्वीपासून अतूट नाते आहे. संगीताचे हे नाते टिकवून ठेवण्यासाठी गोव्यातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महासंगीत महोत्सवाचे आयोजन करावे. त्यामुळे गोव्यातील संगीत रसिकांना एकच ठिकाणी सर्व संगीत संमेलनांचा आस्वाद घ्यायला मिळेल. या संगीत संमेलनाला आपला नेहमी पाठिंबा असणार, अशी ग्वाही दक्षिण गोव्याचे खासदार अँड. नरेंद्र सावईकर यांनी दिली.

Page 6 Inauguration of Emperor Music Conference in Pond | पान 6- फोंड्यात सम्राट संगीत संमेलनाचे उद्घाटन

पान 6- फोंड्यात सम्राट संगीत संमेलनाचे उद्घाटन

ोंडा : गोव्यातील लोकांचे आणि संगीताचे पूर्वीपासून अतूट नाते आहे. संगीताचे हे नाते टिकवून ठेवण्यासाठी गोव्यातील सर्व संस्थांनी एकत्र येऊन महासंगीत महोत्सवाचे आयोजन करावे. त्यामुळे गोव्यातील संगीत रसिकांना एकच ठिकाणी सर्व संगीत संमेलनांचा आस्वाद घ्यायला मिळेल. या संगीत संमेलनाला आपला नेहमी पाठिंबा असणार, अशी ग्वाही दक्षिण गोव्याचे खासदार अँड. नरेंद्र सावईकर यांनी दिली.
संम्राट संगीत अकादमी आणि कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय 36 व्या सम्राट संगीत संमेलनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. हे संमेलन कवळे-फोंडा येथील कवळे मठ मैदानावर आयोजित केले आहे. या वेळी व्यासपीठावर सम्राट संगीत संमेलन आयोजन समितीचे अध्यक्ष व रवींद्र भवनचे अध्यक्ष दामू नाईक, सम्राट इंटरनॅशनल गोव्याचे अध्यक्ष संदीप निगळये, आयोजन समितीचे सचिव दिवाकर शिक्रे , कवळे मठाचे सचिव अँड. सतीश पिळगावकर आदी उपस्थित होते.
सावईकर म्हणाले की, गोव्याचा निसर्ग, सौदर्य व संगीतामुळे गोव्याला वेगळी ओळख लाभली आहे. सम्राट कल्बने एका पिढीकडून नवीन पिढीला संगीताचा वारसा दिला आहे. यामध्ये सम्राट क्लबचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले. या संमेलनामध्ये गोव्यातील, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार सहभागी झाले आहेत.
दरम्यान, उद्घाटन सोहळ्यानंतर कोलकता येथील पं. बुधादित्य मुखर्जी यांच्या सतार वादनाचा तसेच मुंबई येथील र्शुती सडोलीकर काटकर यांच्या मधुर गायनाचा कार्यक्रम झाला. दि. 13 डिसेंबर रोजी संमेलनाची सुरुवात सायंकाळी 5.30 वा. धारवाड येथील धनंजय हेगडे यांच्या गायकीने सुरुवात केली जाईल. त्यानंतर कोलकता येथील पं. सुगातो भादुरी हे मंडोलीनवादन सादर करणार आहेत. त्यानंतर संमेलनाची सांगता दिल्ली येथील विदुषी संहित नंदी यांच्या मधुर गायकीने केली जाणार आहे.
स्वागत दामू नाईक यांनी केले. सूत्रसंचालन मंगला खाडीलकर यांनी केले. दिवाकर शिंक्रे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
ढँ3 : 1112-ढडठ-05
कॅप्शन: संगीत सम्राट अकादमी आणि कला आणि संस्कृती संचालनालय गोवा यांच्यातर्फे आयोजित 36 व्या सम्राट संगीत संमेलनाचे उद्घाटन करताना अँड. नरेंद्र सावईकर. बाजूला माजी आमदार दामू नाईक, दिवाकर शिंक्रे व अँड. सतीश पिळगावकर. (प्रभू फोटो)

Web Title: Page 6 Inauguration of Emperor Music Conference in Pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.