पान ५ सांगे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असतानाही १0८ ची गरज का?
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:37+5:302015-02-18T00:13:37+5:30
सांगेवासियांचा प्रश्न : आरोग्याधिकार्यांनी चौकशी करण्याची मागणी

पान ५ सांगे आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका असतानाही १0८ ची गरज का?
स ंगेवासियांचा प्रश्न : आरोग्याधिकार्यांनी चौकशी करण्याची मागणीसांगे : सांगे आरोग्य केंद्राची नवीन रुग्णवाहिका असताना रुग्णांना हॉस्पिसिओत नेण्यास या केंद्राला कुडचडे येथील १0८ ची गरज का भासते, असा सवाल सांगेवासियांनी केला आहे.सांगे आरोग्य केंद्राची पूर्वी एकच रुग्णवाहिका होती. ती वारंवार नादुरुस्त होत असल्याने वर्षापूर्वी या आरोग्य केंद्राला नवीन रुग्णवाहिका देण्यात आली, असे असताना या केंद्राला अजूनही कुडचडे येथील १0८ ची गरज भासत आहे.या केंद्रावर उपस्थित असलेल्या एका महिला डॉक्टरने फोन करून कुडचडे येथील १0८ रुग्णवाहिका मागविली व नंतर १0८ मधून वाडे कॉलनी १ मधील एका गरोदर महिलेला या आरोग्य केंद्रात आणण्यात आले, तेव्हा रात्रीचे एक वाजले होते. गरोदर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने या केंद्रातील महिला डॉक्टरने १0८ वरील कर्मचार्यांना या महिलेला हॉस्पिसिओत हलविण्यास सांगितले. या वेळी १0८ वर चालक व सेवक दोन्ही पुरुष कर्मचारी असल्याने त्यांनी डॉक्टरकडे गरोदर महिलेबरोबर येण्यासाठी महिला कर्मचार्याची मागणी केली; पण ही मागणी महिला डॉक्टरने धुडकावल्याने १0८ वरील कर्मचार्यांनी गरोदर महिलेला हॉस्पिसिओत हलविण्यास स्पष्टपणे नकार दिला. शेवटी या महिलेला आरोग्य कंेद्राच्या रुग्णवाहिकेने मडगावातील हॉस्पिसिओत हलविण्यात आले.यापूर्वीही या केंद्रातील महिला डॉक्टरकडून १0८ ची मागणी केली होती. या आरोग्य केंद्राची नवीन रुग्णवाहिका असतानाही रुग्णांना इतरत्र हलविण्यास १0८ ची गरज का भासते, याची चौकशी आरोग्याधिकार्यांनी करावी, अशी मागणी सांगेवासियांनी केली आहे. (प्रतिनिधी)