पान 5 : प्रशाल देविदास खून प्रकरणी दोघांची साक्ष
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:19+5:302015-08-27T23:45:19+5:30
मडगाव : सावर्डे येथील प्रशाल देविदास (22) याच्या खून प्रकरणात कुडचडेचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर व हवालदार सुधाकर फळदेसाई यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी नोंदवली. सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी या साक्षीदाराची सरतपासणी घेतली.

पान 5 : प्रशाल देविदास खून प्रकरणी दोघांची साक्ष
म गाव : सावर्डे येथील प्रशाल देविदास (22) याच्या खून प्रकरणात कुडचडेचे पोलीस उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर व हवालदार सुधाकर फळदेसाई यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांनी नोंदवली. सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी या साक्षीदाराची सरतपासणी घेतली.गुड्डेमळ-सावर्डे येथे विशाल बारजवळ प्रशाल देविदास याचा मृतदेह सापडला होता. घटनास्थळावरून रक्तमिर्शित माती, चप्पल, कमरप?ा, केस जप्त केले. गुन्?ाच्या जागेचा पंचनामा केला तसेच मयताचे कपडे जप्त केल्याचे उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी सांगितले. आपला मुलगा प्रशाल बेपत्ता असल्याची तक्रार फिर्यादी प्रेमा देविदास यांनी दिल्यानंतर आपण मिसिंग रिपोर्ट दाखल करून घेतल्याचे हवालदार सुधाकर फळदेसाई यांनी न्यायालयात सांगितले. गुड्डेमळ-सावर्डे येथील मगन नायर, जितेंद्र बसप्पा नाईक व एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाने प्रशाल देविदास याचा 15 जून 2014 रोजी संध्याकाळी खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. संशयितांनी प्रथम प्रशालला भरपूर दारू पाजली. नंतर त्याला घेऊन ते जवळच्या वन खात्याच्या जंगलात गेले. तेथे त्याला लाथा घालून खाली पाडले. संशयित बालगुन्हेगाराने त्याचा कमरप?य़ाने गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. बशीर नावाची एक व्यक्ती प्रशालला पैसे देणे लागत होती. प्रशालने रोज पैशासाठी तगादा लावल्याने बशीरचा मित्र जितेंद्र नाईक चिडला होता. या कारणावरून त्यांनी प्रशालचा खून केल्याचा आरोप आहे. हा खटला अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत एकूण 14 साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदवल्या आहेत. 2 सप्टेंबरला कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांची साक्ष होईल. (प्रतिनिधी)