पान 5- कामुर्लीत पोरसु पिक धोक्यात

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:18+5:302015-03-06T23:07:18+5:30

कामुर्ली : खैराट येथील शेतकर्‍यांनी लावलेले पोरसू पिक पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

Page 5 - Porous pickup threat in commuters | पान 5- कामुर्लीत पोरसु पिक धोक्यात

पान 5- कामुर्लीत पोरसु पिक धोक्यात

मुर्ली : खैराट येथील शेतकर्‍यांनी लावलेले पोरसू पिक पावसामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे सरकारने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी पोरसू पीक घेतात. यामध्ये हळसाणे व मिरची लागवड केली जाते. यावर्षी वेळेत लागवड करण्यात आली होती. येत्या काही दिवसात उत्पन्न मिळणार होते. पण काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे शेतात पाणी भरले. त्यामुळे पीक पाण्याखाली गेले. जवळपास दोन दिवस शेतात पाणी राहिल्याने पिकावर परिणाम झाला. हळसाणेची रोपे सुकल्याने मरून गेली आहेत. कांद्याची रोपे पिवळी पडली आहेत. मिरची व कांद्याची रोपे अजूनही पिक मिळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती शेतकरी अजित नाईक यांनी दिली. कांता नाईक, गुरूदास नाईक, भानुदा नाईक, उमेश केसरकर, सुभाष शेटये, शोभा केसरकर, लक्ष्मण केसरकर, या शेतकर्‍यांची हानी झाली आहे. कृषी खात्याच्या अधिकार्‍यांनी पाहणी करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
फोटो : 1) पिवळी पडलेली कांद्याची रोपे.
2) सुकलेली हळसाणेची रोपे. (जयेश नाईक)

Web Title: Page 5 - Porous pickup threat in commuters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.