पान ५ : बायणा किनार्‍यावरील १५४ झोपड्यांना किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणच्या नोटिसा

By Admin | Updated: July 13, 2015 01:06 IST2015-07-13T01:06:50+5:302015-07-13T01:06:50+5:30

पणजी : बायणा किनार्‍यावरील १५४ झोपड्यांना गोवा किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या असून २७ जुलैपर्यंत या नोटिसांना उत्तर द्यावे लागणार आहे.

Page 5: Notices of the coastal management authority for 154 huts on the Bayana coast | पान ५ : बायणा किनार्‍यावरील १५४ झोपड्यांना किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणच्या नोटिसा

पान ५ : बायणा किनार्‍यावरील १५४ झोपड्यांना किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणच्या नोटिसा

जी : बायणा किनार्‍यावरील १५४ झोपड्यांना गोवा किनारप˜ी व्यवस्थापन प्राधिकरणाने नोटिसा बजावल्या असून २७ जुलैपर्यंत या नोटिसांना उत्तर द्यावे लागणार आहे.
दक्षिण जिल्हाधिकार्‍यांनी या झोपड्यांचे प्रकरण प्राधिकरणाकडे सोपविले होते. प्राधिकरणाच्या बैठकीत नोटिसा जारी करण्याचा निर्णय झाला. बायणा किनार्‍यावरील एकूण २0५ झोपड्या सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप आहे. यातील ५१ झोपड्या धडक कारवाईत जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर उर्वरित झोपड्यांचे मालक न्यायालयात गेले. १९८६ च्या पर्यावरण संवर्धन कायद्याच्या कलम ५ (नियम ४ सह) खाली या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
झोपड्यांच्या मालकांनी त्यांच्याकडे असलेले बांधकाम, पुनर्बांधकाम, दुरुस्ती किंवा तत्सम जे दाखले आहेत ते सादर करावे लागतील.
राज्य सरकारने बायणा किनार्‍याच्या सौंदर्यीकरणाची योजना आखली आहे. त्यासाठी किनार्‍यावरील या बेकायदा झोपड्या दूर करणे आधी आवश्यक असल्याचे महसूल अधिकार्‍याने बोलून दाखवले. जिल्हा प्रशासनाने या झोपड्या हटविण्याचा निर्धार केला आहे. कोणतीही कारवाई करण्याआधी आमचे पुनर्वसन करा, अशी मागणी दुसरीकडे हे झोपडीमालक करीत आहेत. गेली ४0 ते ५0 वर्षे येथे वास्तव्य असूनही सरकार पुनर्वसनाबाबत काहीच बोलत नाही, असे झोपडीमालकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Page 5: Notices of the coastal management authority for 154 huts on the Bayana coast