पान ४- वास्कोत राजस्थानी ग्रामीण मेळाचे उद्घाटन ३१ डिसेंबरपर्यंत बायणा रवींद्र भवनात चालू
By Admin | Updated: December 22, 2014 23:11 IST2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30
वास्को : बायणा येथील रवींद्र भवनामध्ये आयोजित केलेल्या राजस्थान ग्रामीण मेळाचे आज सकाळी बायणा रवींद्र भवनचे उपाध्यक्ष चंद्रकांत गावस यांच्या हस्ते करण्यात आले.

पान ४- वास्कोत राजस्थानी ग्रामीण मेळाचे उद्घाटन ३१ डिसेंबरपर्यंत बायणा रवींद्र भवनात चालू
व स्को : बायणा येथील रवींद्र भवनामध्ये आयोजित केलेल्या राजस्थान ग्रामीण मेळाचे आज सकाळी बायणा रवींद्र भवनचे उपाध्यक्ष चंद्रकांत गावस यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनात विविध देशातील विविध कलाकारांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचे ७५ दालने उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये शांतीनिकेतन कथ्था सिल्क साडी, कॉटन तसेच रेशमी साड्या, कर्नाटकातील हुबळी सिल्क कॉटन साड्या, भगलपूर येथील सिल्क ड्रेस कपडे, तसेच बिहार येथील चुडिदार सिल्क आणि कॉटन ड्रेस कपड्याचा समावेश आहे.त्याचप्रमाणे गुजराथ आरशाकामाने वीणलेले कपडे, हैद्राबादी मोत्याचे दागिने, तसेच विविध प्रकारच्या खड्याचे अलंकार, शोभेच्या वस्तू ग्राहकांना भुरळ घालत आहे. खादीच्या तसेच हॅन्डलुम कपडेही या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ग्राहकही या मेळाव्याकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे.यावेळी राजस्थान कला आणि हस्तकला प्रदर्शनाचे आयोजक दिनेश यांनी पत्रकारांशी बलताना, देशातील दरिद्र रेषेखाली असलेल्या हस्तकला कारागिरांना त्यांच्यातील कौशल्य सिद्ध करून दाखविण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देणे असा या मेळावा आयोजनामागील हेतू आहे. भारतीय हस्त कारागिरीला ेक महत्त्वाचे स्थान असून ही पारंपरिक कला जिवंत ठेवल्याचे तसेच आमच्या संस्कृती तसेच आर्थिख व्यवस्थेतून आमच्या कारागिरांची श्रीमंती टिकवून ठेवणे हे आमचे प्रय्तन आहे, असे सांगितले.बायणा रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष चंद्रकांत गावस यांनी हा बायणा रवींद्र भवनाच्या वर्षपूर्तीनिमित्त हे प्रदर्शन भरविण्याचा एक उपक्रम हाती घेतलाला असून येत्या काही दिवसांत अन्य कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेले आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)फोटो ओळी-बायणा रवींद्र भवनात भरविण्यात आलेल्या राजस्थानी ग्रामीण मेळाचे उद्घाटन करताना चंद्रकांत गावस. (छाया : अनिल चोडणकर)