पान ४ आश्वासनाची पूर्ती न झाल्यास बार्जेस नदीत नांगरणार
By Admin | Updated: December 23, 2014 00:04 IST2014-12-23T00:04:03+5:302014-12-23T00:04:03+5:30
गोवा बार्जमालक संघटनेचा इशारा

पान ४ आश्वासनाची पूर्ती न झाल्यास बार्जेस नदीत नांगरणार
ग वा बार्जमालक संघटनेचा इशारावास्को :गोव्यातील खनिज मालाचा लिलाव करताना गोव्यातील बार्जमालकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यास सर्व बार्ज मांडवी व जुवारी नदीमध्ये नांगरून ठेवण्याचा इशारा गोवा बार्जमालक संघटनेचे अध्यक्ष अतुल जाधव यांनी दिला आहे़ मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना या प्रकरणी निवेदन दिले आहे. त्यानंतर सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जाधव म्हणाले, गोव्यातील डंप खनिजाचा ई-लिलाव करताना जल वाहतुकीसाठी ४८ तासाला प्रत्येक बार्जला प्रति टनामागे शंभर रुपये निश्चित केले होते़ माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेतला होता़ गोव्यातील बार्जमालकांनी त्यानुसार एकूण ६० बार्जेस तयार केल्या असून कामगारही नेमले आहेत़ मात्र, खनिज खरेदी करताना मेसर्स सेसा स्टरलाइट कंपनीने सर्वांना योग्य पध्दतीने ट्रीप मिळण्यासाठी तयार केलेल्या यादीला बाजूला करून साळगावकर व तिंबलो कंपनीच्या बार्जेस माल वाहतुकीसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे़ गोव्यातील बार्जमालकांनी ना नफ ा ना तोटा या तत्त्वावर माल वाहतूक करण्यासाठी निर्णय घेतला होता़ बंदर खात्याचे मंत्री दिलीप परुळेकर तसेच मुख्यमंत्री पार्सेकर यांना निवेदन देऊन एकूण परिस्थितीची माहिती दिली आहे. या प्रकरणी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे जाधव यांनी सांगितले़ या वेळी बार्जमालक संघटनेचे रेमंड डिसा, विलियम डिकॉस्ता, उदय नाईक व चंद्रकांत गावस यांनी आपले विचार मांडले़ पत्रकार परिषदेला इतर बार्जमालक उपस्थित होते़ (प्रतिनिधी)