पान ४- पंचायत संचालनालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:15+5:302015-07-22T00:34:15+5:30
कुंभारजुवे : खांडोळा येथील गोवन पॅराडाइज प्रकल्प बांधकाम परवान्याबाबत राज्य पंचायत संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांनी गोवन पॅराडाइज विरुद्ध बेतकी-खांडोळा पंचायत खटल्यात दि. ८ जुलै रोजी डीडीपीएन/बेतकी-खांडोळा/पोन/१६/२०१५ क्रमांकाखाली बांधकाम परवान्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी शुक्रवार, दि. २४ रोजी होणार आहे.

पान ४- पंचायत संचालनालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
क ंभारजुवे : खांडोळा येथील गोवन पॅराडाइज प्रकल्प बांधकाम परवान्याबाबत राज्य पंचायत संचालनालयाच्या सहाय्यक संचालकांनी गोवन पॅराडाइज विरुद्ध बेतकी-खांडोळा पंचायत खटल्यात दि. ८ जुलै रोजी डीडीपीएन/बेतकी-खांडोळा/पोन/१६/२०१५ क्रमांकाखाली बांधकाम परवान्यासाठी देण्यात आलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी शुक्रवार, दि. २४ रोजी होणार आहे.मागील ग्रामसभेत गोवन पॅराडाइजच्या खांडोळा येथील महाप्रकल्पाबाबत स्थानिकांनी पंचायतीला धारेवर धरले होते. त्या वेळी सरपंच सुदीक्षा खांडोळकर यांनी महाप्रकल्प परवाना प्रकरणावर पंचायत मंडळ बैठकीत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी पंचायत संचालनालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.निवासी व व्यापारी प्रकल्प बांधकामासाठी आदेश मिळाल्यापासून ६ दिवसांच्या आत परवाना मंजूर करण्यात यावा, असा पंचायतीला निर्देश दिला होता. पंचायत मंडळातर्फे दि. १७ रोजी या आदेशाला आव्हान दिले होते. येथील महागणपती संस्थान समिती महाजन व भक्तगणांचा या प्रकल्पास विरोध आहे. (प्रतिनिधी)