पान 3 : अखेर कुर्टी उपसरपंचांवरील अविश्वास ठराव संमत
By Admin | Updated: August 3, 2015 22:26 IST2015-08-03T22:26:36+5:302015-08-03T22:26:36+5:30
फोंडा : सत्तानाट्यामुळे चर्चेत आलेले कुर्टी-खांडेपारचे उपसरपंच नरेंद्र परब यांच्यावरील अविश्वास ठराव सोमवारी संमत झाला. सरपंचा सुप्रिया गावडे यांनी भाजपा प्रणित पंचांच्या साहाय्याने हा ठराव दाखल केला होता. मात्र, दुसर्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन या ठरावावर आपण दबावापोटी सही केल्याचे सांगितले होते. मात्र, अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी उपसरपंच नरेंद्र परब अनुपस्थित राहिल्याने विरोधी गटासह सत्ताधारी गटातील सदस्यांनीही ठरावाच्या बाजूने कौल दिला. यामुळे पंचायत मंडळात किंगमेकरची बिरूदावली मिरवणार्या नरेंद्र परब यांच्या राजकीय वाटचालीस खो बसल्याची चर्चा पंचायत क्षेत्रात सुरू आहे.

पान 3 : अखेर कुर्टी उपसरपंचांवरील अविश्वास ठराव संमत
फ ंडा : सत्तानाट्यामुळे चर्चेत आलेले कुर्टी-खांडेपारचे उपसरपंच नरेंद्र परब यांच्यावरील अविश्वास ठराव सोमवारी संमत झाला. सरपंचा सुप्रिया गावडे यांनी भाजपा प्रणित पंचांच्या साहाय्याने हा ठराव दाखल केला होता. मात्र, दुसर्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन या ठरावावर आपण दबावापोटी सही केल्याचे सांगितले होते. मात्र, अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी उपसरपंच नरेंद्र परब अनुपस्थित राहिल्याने विरोधी गटासह सत्ताधारी गटातील सदस्यांनीही ठरावाच्या बाजूने कौल दिला. यामुळे पंचायत मंडळात किंगमेकरची बिरूदावली मिरवणार्या नरेंद्र परब यांच्या राजकीय वाटचालीस खो बसल्याची चर्चा पंचायत क्षेत्रात सुरू आहे. याबाबत सरपंचा सुप्रिया गावडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पंचायतीचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठीच हा अविश्वास ठराव सर्वानुमते संमत करण्यात आल्याचे सांगितले. आपण अविश्वास ठरावावर दबावापोटी सही केल्याचे वर्तमानपत्रात छापून आले. मात्र, हा प्रकार गैरसमजुतीतून घडल्याचे त्या म्हणाल्या. वास्तविक नरेंद्र परब यांनी आपल्यावर अविश्वास ठराव आणू नका, आपण स्वत: राजीनामा देतो, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी आपला शब्द न राखल्यामुळेच अविश्वास ठरावाचा निर्णय घेतल्याचे त्या म्हणाल्या. अविश्वास ठराव दाखल केल्याच्या दिवशीदेखील परब यांनी ठराव मागे घ्या आपण उद्याच राजीनामा देतो, असा शब्द दिला होता. त्यामुळेच आपण अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर तो मागे घेत असल्याचे निवेदन गट विकास अधिकार्यांना दिले होते. मात्र, शेवटपर्यंत परब यांनी आपला शब्द न पाळल्यामुळे हा ठराव संमत झाल्याचे त्या म्हणाल्या. पंचायतीतील भाजपा प्रणित सदस्यांचे नेते संदीप खांडेपारकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा अविश्वास ठराव एकतर्फी संमत झाल्यामुळे विरोधी गटाने सरपंचावर दबाव आणल्याचा दावा खोटा ठरल्याचे सांगितले. या अविश्वास ठरावाला सत्ताधारी गटानेही संमती दिल्यामुळे उपसरपंच सर्वांसाठीच डोकेदुखी ठरले होते, हे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. नवीन उपसरपंचांची निवड करताना विरोधी गटातील उमेदवार अर्ज भरणार का, असे विचारले असता उपसरपंच निवडीची तारीख निश्चित झाल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपसरपंच नरेंद्र परब यांनी अविश्वास ठरावावरील चर्चा टाळण्याची विनंती पंचायत मंडळाकडे केली होती. आपण स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे त्यांनी काही सदस्यांना कळविले होते. मात्र, त्यांच्या खोट्या आश्वासनांवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसल्यामुळे परब यांच्यावरील अविश्वास ठराव 10 विरुद्ध 0 मतांनी संमत करण्यात आला. या अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी गटविकास कार्यालयातील अधिकारी सद्गुरू मडकईकर यांनी काम पाहिले तर पंचायत सचिव शेख हिदायत मुल्ला यांनी त्यांना सहकार्य केले. (प्रतिनिधी)