पान 3 : मस्ट जन स्वास्थ अभियानाची 18 रोजी मुंबईत जनसुनावणी
By Admin | Updated: September 11, 2015 21:24 IST2015-09-11T21:24:57+5:302015-09-11T21:24:57+5:30

पान 3 : मस्ट जन स्वास्थ अभियानाची 18 रोजी मुंबईत जनसुनावणी
>पणजी : सरकारी व खासगी आरोग्य सेवांमध्ये होणार्या रुग्ण हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय मानव अधिकार व जन स्वास्थ अभियानतर्फे मोहिम सुरु करण्यात आली आहे. रुग्णांना सेवा मिळविण्यास त्रास झाला असेल तर त्यांनी मुंबई येथे 18 व 19 नोव्हेंबर रोजी होणार्या पश्चिम विभागीय जन सुनावणीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयटकने केले आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतर्फे सुनावणीचे आयोजन करण्यात येणार आहे. पश्चिम विभागीय जन सुनावणीमध्ये राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. पुण्याहून जन स्वास्थ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. अभय शुक्ला यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती देण्यात आली. खासगी व सरकारी आरोग्य सेवांमध्ये उल्लंघन होत असेल तर त्यावर कारवाई करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्याच प्रमाणे आरोग्य विमा किंवा इतर वैद्यकीय सेवेशी निगडीत योजनांवर झालेल्या फसवणूकीबाबत तक्रारी ऐकल्या जातील. अशा तक्रारी नोंद करुन घेतल्या जातील व त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरु केली जाईल. सरकारी आरोग्य व्यवस्थेत केसेस सोबत व्यवस्थात्मक त्रुटी संबंधी मुद्यांवर राष्ट्रीय मानव अधिकारी आयोग जास्त भर देईल. डॉक्टरांची, आरोग्य उपकरणांची कमतरता यावरही चर्चा करण्यात येईल. तसेच महिला, दलित, आदिवासी, कामगार यांच्या आरोग्य संबंधित मुद्यांवर चर्चा होईल, असे शुक्ला यांनी सांगितले. गोवा राज्यातील व्यक्ती किंवा गट ज्यांच्यावर आरोग्य हक्कांचे गंभीर उल्लंघन झाले आहे आणि जे या सुनावणीत सहभागी होउ इच्छितात त्यांनी आयटकशी संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य अभियानने केले आहे.